१८ लाखांची बाईक, ३० हजाराचे हेल्मेट..तरीही जीव नाही वाचला

३४ वर्षाच्या रोहित सिंह नावाच्या इसमाचा मृत्यू झाला. रोहितने २ महिने आधी दिल्लीहून १८ लाख रुपयांची बाईक घेतली होती. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 19, 2017, 11:30 AM IST
१८ लाखांची बाईक, ३० हजाराचे हेल्मेट..तरीही जीव नाही वाचला  title=

जयपूर : बाईक वरून अपघात झाल्याची घटना सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार जयपुरमध्ये गुरूवारी रात्री हा अपघात झाला. 

मध्ये ३४ वर्षाच्या रोहित सिंह नावाच्या इसमाचा मृत्यू झाला. रोहितने २ महिने आधी दिल्लीहून १८ लाख रुपयांची बाईक घेतली होती. 

३० हजारांचे हेल्मेट 

ही पॉवर बाईक चालविण्यासाठी रोहितने ३० हजार रुपयांचे हेल्मेट खरेदी केले होते.

२५ हजारांचे जॅकेट 

 एजीबी रेंज-३ हेल्मेटसोबत सुरक्षेसाठी २५ हजार रुपयांचे हेल्पलाईन जॅकेटदेखील खरेदी केले होते. 

६ हजारांचे ग्लब्ज 

 त्याने ६ हजार रुपयांचे ग्लब्ज घातले होते.हाय स्पीड बाइक अपघतातून वाचण्यासाठी त्याने हे केले होते. 

हेल्मेट अनलॉक 

पण जेव्हा अपघात झाला तेव्हा ३० हजारांचे हेल्मेटचे लॉक उघडात आले नाही.

डोक्यातून रक्त गेल

रोहित जेव्हा रोडवर जखमी अवस्थेत होता तेव्हा लोकांनी त्याचे हेल्मेट खोलण्याचा प्रयत्न केला. पण कोणालाही ते शक्य झालं नाही. डोक्यातून बरेच रक्त वाहून गेल आणि जास्त रक्त गेल्याने त्याचा मृत्यू झाला. 
 
अपघातानंतर हेलमेटचे ऑटो लॉक न खोलले गेल्याने तोंड आणि नाकातून रक्त बाहेर पडू लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दोघांना वाचवायला गेला...

 जयपूरच्या न्यू लाइट कॉलनीत राहणारा रोहित रात्री १० वाजता जवाहरलाल नेहरू मार्गावरील ओटीएसच्या दिशेने जात होता.

तेव्हा रस्ता क्रॉस करणाऱ्या दोघांना वाचविण्याच्या नादात बाईक सरकली.दुसऱ्या दिशने येणाऱ्या अखिलेश नामक तरुणाला जाऊन बाईक ठोकली.

अखिलेशदेखील यात जखमी झाल्याची माहिती जयपूर स्थानिक पोलिसांनी दिली.

३ वर्षांपूर्वी लग्न 

रोहित हा लॅंड रोवर कंपनीत सेल्स मॅनेजर होता. आई वडिलांचा तो एकूलता एक मुलगा होता. ३ वर्षापूर्वीच त्याच लग्न झाल होत आणि त्याला दिड वर्षाचा एक मुलगादेखील होता.