जम्मू पोलिसांनी जप्त केल्या मोठ्या प्रमाणात नकली नोटा

२०० रुपयांच्या नोटा चलनात आल्या खऱ्या मात्र, अद्यापही बाजारात किंवा एटीएममध्ये या नोटा मोठ्या प्रमाणात पहायला मिळत नाहीयेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 8, 2017, 09:32 PM IST
जम्मू पोलिसांनी जप्त केल्या मोठ्या प्रमाणात नकली नोटा title=
Representative Image

नवी दिल्ली : २०० रुपयांच्या नोटा चलनात आल्या खऱ्या मात्र, अद्यापही बाजारात किंवा एटीएममध्ये या नोटा मोठ्या प्रमाणात पहायला मिळत नाहीयेत. असे असतानाच २०० रुपयांच्या नोटांसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

नकली नोटा जप्त

जम्मूमध्ये २०० रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जम्मू पोलिसांनी शुक्रवारी तब्बल ६.३६ लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत.

नोटांची छपाई होती सुरु

या प्रकरणी पोलिसांनी एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे जो कथित स्वरुपात आपल्या भाड्याच्या घरात नकली नोटांची छपाई करत होता.

'या' नकली नोटा केल्या जप्त 

यासंदर्भात हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिलं आहे. पोलिसांनी सांगितले की, ज्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत त्यामध्ये २०० रुपयांच्या २७० नोटा, ११५० रुपयांच्या ५०० नोटा आणि ५० रुपयांच्या १९ नोटांचा समावेश आहे. आरबीआयने २०० रुपयांची नोट याच वर्षी ऑगस्ट महिन्यात चलनात आणली होती.

SITची स्थापना

रियासी जिल्ह्यातील चसाणा परिसरात सुंगरीमधील मोहम्मद मकबूल यांच्याकडून नकली नोटा बाळगल्याचं समोर आल्यानंतर १ डिसेंबर रोजी प्राथमिक रिपोर्ट दाखल करण्यात आला. त्यानंतर एका स्पेशल इन्वेस्टीगेशन्स टीम बनवण्यात आली. 

त्यानंतर या टीमने कुलगाम जिल्ह्यातील नूरपुरा येथे राहणाऱ्या शौकत अहमद याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून एक कम्प्यूटर, एक स्कॅनर, पेपर कटींग मशीन, पेपर कटर आणि फोटोकॉपी पेपर्सचा एक गठ्ठाही जप्त केला.