लष्कराच्या विरोधात दगडफेक करणारांच्या हाती क्रिकेट बॅट

क्रिकेट हा खेळ तमाम भारतीयांना कसं जोडून ठेवू शकतो, याचा प्रत्यय काश्मिरातल्या उरी भागात पाहायला मिळाला. एरव्ही काश्मिरी तरूण लष्कराच्या विरोधात दगडफेक करायला पुढं असतात. पण उरीमधल्या स्थानिक काश्मिरी तरूणांनी हातात चक्क क्रिकेटची बॅट आणि बॉल धरला.

Updated: Aug 12, 2017, 04:06 PM IST
लष्कराच्या विरोधात दगडफेक करणारांच्या हाती क्रिकेट बॅट title=

श्रीनगर : क्रिकेट हा खेळ तमाम भारतीयांना कसं जोडून ठेवू शकतो, याचा प्रत्यय काश्मिरातल्या उरी भागात पाहायला मिळाला. एरव्ही काश्मिरी तरूण लष्कराच्या विरोधात दगडफेक करायला पुढं असतात. पण उरीमधल्या स्थानिक काश्मिरी तरूणांनी हातात चक्क क्रिकेटची बॅट आणि बॉल धरला.

यानिमित्तानं भारतीय लष्कर आणि काश्मिरी तरूण यांच्यातलं नातं आणखी दृढ झालं. 17 जुलैपासून 9 ऑगस्टपर्यंत रंगलेल्या उरी प्रीमीयर लिग क्रिकेट टी 20 सामन्यांमध्ये  तब्बल 50 काश्मिरी संघांनी भाग घेतला. भारतीय लष्कर, असीम संघटना आणि काळा पहाड ब्रिगेड यांच्या पुढाकारानं उरी चायनीज क्लब ग्राऊंडवर पार पडलेल्या या क्रिकेट सामन्यांमध्ये तब्बल 4 हजाराहून अधिक काश्मिरींनी सहभाग घेतला. 

नंबाला स्टार्स ही टीम या क्रिकेट स्पर्धेची विजेती ठरली. बारामुल्लाचे कोअर कमांडर मेजर जनरल आर. पी. कलिता यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. ही विजेती टीम येत्या ऑक्टोबर महिन्यात पुण्यामध्ये येणार असून, त्याठिकाणी उरी इलेव्हन विरूद्ध पुणे इलेव्हन असा सामना रंगणार आहे.