अहमदाबाद: गुजरातमध्ये शनिवारपासून जगन्नाथाच्या रथयात्रेला सुरुवात झाली. यासाठी भाविकांनी अहमदाबादमध्ये मोठी गर्दी केली आहे. भाजपध्यक्ष अमित शहा आणि विजय रुपाणी यांनी आज सकाळीच जगन्नाथाचे दर्शन घेतले. सकाळी दहा वाजल्यापासून ही रथयात्रा सुरु झाली असून रात्री उशिरापर्यंत ही सुरु राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्यात.
या यात्रेसाठी तीन आकर्षक रथ सजवण्यात आलेत. अहमदाबादसह ओडिशातील पुरीमध्येही भगवान जगन्नाथ रथयात्रेचा उत्साह पाहायला मिळतोय. या रथयात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेत. केवळ देशातीलच नाही तर जगभरातून भाविक या रथयात्रेत सामील झालेत. नऊ दिवस हा उत्सव चालतो.
Best wishes to the Kutchi community on Aashadhi Beej, the Kutchi New Year.
May the coming year bring happiness as well as good health in everyone’s life and may everyone’s aspirations be fulfilled.
— Narendra Modi (@narendramodi) July 14, 2018