भारताच्या VVIP व्यक्तींच्या iPhone वर मालवेअर अटॅक, सुरक्षितता धोक्यात

 १३ जणांना निशाण्यावर... पण, हे १३ जण कोण?

Updated: Jul 14, 2018, 03:32 PM IST
भारताच्या VVIP व्यक्तींच्या iPhone वर मालवेअर अटॅक, सुरक्षितता धोक्यात title=

नवी दिल्ली : देशातील १३ व्हीव्हीआयपीच्या आयफोनर मालवेअर अटॅक झाल्याची शंका उपस्थित केली जातेय. या महत्त्वाच्या व्यक्तींच्या आयफोनमधून मॅसेज, व्हॉटसअप लोकेशन, चॅट लॉग, फोटो आणि कॉन्टॅक्ट अशा महत्त्वाची माहितीही चोरीला गेल्याचं म्हटलं जातंय. कमर्शिअल थ्रेट इंटेलिजन्स ग्रुप 'सिस्को टुल्स' शोधकर्त्यांनी आणि तज्ज्ञांनी हा उच्च स्तरीय हल्ला असल्याचं म्हटलंय. यामध्ये १३ जणांना निशाणा बनवण्यात आलंय... परंतु, हे १३ जण कोण आहेत? त्यांची ओळख मात्र सार्वत्रिक करण्यात आलेली नाही. 

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा ऑनलाईन हल्लेखोर भारतातूनच आपल्या कारवाया हाताळत असल्याची शक्यता आहे. परंतु, तो स्वत: रशियामध्ये असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हल्लेखोरानं रशियाच्या नावाचा आणि रशिच्या ई-मेल डोमेनच्या नावाचा वापर केलाय. हल्लेखोरानं दोन पर्सनल डिव्हाईसमध्ये भारताच्या व्होडाफोन नेटवर्कचा वापर केलाय. हल्लेखोरानं १३ आयफोनचा अॅक्सेस घेण्यसाठी ओपन सोर्स मोबाईल डिव्हाईस मॅनेजमेंट सिस्टम तयार केलाय, असं टालोस इंटेलिजन्स ब्लॉगवर म्हटलंय. 

व्हॉटसअप आणि टेलिग्रामसारख्या मॅसेजिंग अॅपमध्ये वेगळे फिचर्स जोडण्यासाठी वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. त्यानंतर टार्गेट करण्यात आलेल्या १३ आयफोनमध्ये MDM द्वारे ते पाठवण्यात आले. त्यामुळे या फोनचा सीरियल नंबर, लोकेशन, कॉन्टॅक्ट, फोटो, एसएमएस, टेलिग्राम आणि व्हॉटसअप चॅटची सुरक्षा धोक्यात आहे.