'रोजगार देण्यात गुजरात नंबर एक', गुजरातच्या पॅक्स मॉडेलविषयी जगदीश विश्वकर्मा यांचा मोठा दावा

Jagadish Vishkarma Reaction Coperative Movement:  सध्या पॅक्स हे मॉडेल गुजरातमध्ये सुरु असून संपूर्ण राज्यात चालवले जाणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Sep 28, 2024, 12:07 PM IST
'रोजगार देण्यात गुजरात नंबर एक', गुजरातच्या पॅक्स मॉडेलविषयी जगदीश विश्वकर्मा यांचा मोठा दावा title=
जगदीश विश्वकर्मा

Jagadish Vishkarma Reaction Coperative Movement: पॅक्स हे केवळ गावांसाठी नाही. बीयांची खरेदी आणि विक्री व्हायची. पण पॅक्स मॉडल आणल्यानंतर नियम आले. देशातील सर्व पॅक्स कॉम्प्युटराइज करण्यात येतायत. पॅक्स आधी २ कामे करायची. पेट्रो पम्प, गावात रेल्वे तिकटी, एअर तिकीट, गॅस योजना अशा राबवली जाईल. यामुळे कोणाला जिल्ह्यात जावं लागणार नाही. यामुळे युवांना रोजगार मिळेल, असे जगदीश विश्वकर्मा म्हणाले. सध्या हे मॉडेल गुजरातमध्ये सुरु असून संपूर्ण राज्यात चालवले जाणार आहे.

अमूलची सुरुवात 10 जणांनी केली. पण आता रोजचे ३१ मिलियन दूध गोळा करत. 36 लाख शेतकरी यात सहभागी होतात.80 हजार करोडहून जास्त अमूलचा टर्नओव्हर आहे. अमूल संपूर्ण देशाला दूध देतोय तसेच देशाबाहेरील कंपन्यांनाही दूध पुरवठा करतंय. 8 लाख मेट्रीक टनची ऑर्डर आता अमूलला मिळाली आहे. जसे दुधाचे मॉडेल आहे, त्याप्रमाणे नॅचरल फार्मिंगचे मॉडेल उभारले जातय. ९ लाखाहून अधिक शेतकरी नॅचरल फार्मिंगशी जोडले गेलेयत.

केंद्रात अमित शहांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालय तयार करण्यात आले. सर्वांना एका मंचाखाली आणण्यात आलंय. हाऊसिंग सोसायटीमधील नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. अमित शहांनी सहकार विभाग 360 अंश कोनातून बदलंय.

केंद्राने सेमी कंडक्टर पॉलीसी आणली त्याच्या एका महिन्यात गुजरातने पॉलिसी आणली. 4 मोठे गुंतवणूकदार आमच्याकडे आहेत. गुजरात जगाला सेमी कंडक्टरचा पुरवठा करेल. गुजरात हे तरुणांना रोजगार देणारे 1 नंबरचे राज्य असल्याचे ते यामुळे म्हणाले. 

देशाच्या 140 कोटी जनतेने एक भ्रष्टाचाराचे आणि दुसरे विकासाचे मॉडेल पाहिले आहे. आधी काळात देशाच्या पंतप्रधांनांना कोणी ओळखत नव्हते. पण पंतप्रधान मोदींचा जगभरात दबदबा आहे. आमच्याकडे मोठे व्हिजन आहे. गावातल्या शेवटच्या नागरिकांचा आम्ही विचार करतो. 

डबल इंजिन सरकार
केंद्रात आणि राज्यात आम्ही आहोत. भाजपवाले काम करुन देतात, यावर लोकांना विश्वास आहे. त्यामुळे ते आम्हाला निवडून देतात.