ITR दाखल करुन रिफंड न मिळण्याचं 'हे' आहे कारण; जाणून घ्या

Income Tax Refund Status : जुलै महिन्यात इनकम टॅक्स रिटर्न दाखल केलाय पण अद्याप रिफंड मिळालेला नाही? तर ही असतील यामागची कारणं.

Updated: Aug 23, 2022, 12:44 PM IST
ITR दाखल करुन रिफंड न मिळण्याचं 'हे' आहे कारण; जाणून घ्या title=

Income Tax Refund : आयकर विभागाकडून इनकम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्यासाठी 31 जुलै 2022 ही अंतिम तारीख देण्यात आली होती. असं असलं तरी, अजूनही आयटीआर (ITR) भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. पण यासाठी अतिरिक्त फी भरवी लागतेय. मुळ प्रश्न हा आहे की, जुलै महिन्यात आयटीआर दाखल करुनसुद्धा अजून रिफंड मिळालेला नाही. काय त्रुटी राहिल्या असतील बरं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

इनकम टॅक्स रिफंड स्टेटस कसं चेक करावं?

1. इनकम टॅक्स रिफंड मिळण्यासाठी तुम्ही त्याचं स्टेटस ऑनलाईन चेक करु शकता.
2. आयकर ई-फायलिंग पोर्टल किंवा एनएसडीएल या वेबसाईटवर याबद्दलची माहिती घेऊ शकता.
3. सर्वात प्रथम, आयकर विभागच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर जा आणि Login करा.
4. यानंतर व्यू रिटर्न/ फॉर्म्सवर क्लिक करा.
5. पुढे, इनकम टॅक्स रिटर्न निवडा आणि असेसमेंट ईअर टाईप करा.
6. आता तुम्हाला रिफंडची स्थिती समजेल.
7. एनएसडीएलच्या वेबसाईटद्वारे देखील रिफंडची माहिती मिळवली जाते.

तुमचा इनकम रिफंड का अडकू शकतो?

1. कित्येकदा इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून पैसै जारी झाल्यानंतरही रिफंड मिळत नाही.
2. चुकीच्या बँक अकाउंट डिटेल्समुळे देखील रिफंड मिळत नाही.
3.  अशावेळी इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर बँक डिटेल्स अपडेट करुन घ्यावेत.
4. यानंतर तुम्ही रिफंड मिळवण्यासाठी पात्र व्हाल.
5. इनकम टॅक्स अॅक्टच्या कलम 143(1) नुसार, नोटीस दाखवली जाईल की टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला रिफंड देणार की नाही.
6. जर नोटिसमध्ये तुम्हाला रिफंड दाखवलं गेलं तर रिफंड जारी केलं जाईल.
7. जर नोटिसमध्ये शुन्य रिफंड दाखवलं गेलं, तर तुमचा रिफंड क्लेम स्विकारलेला नाही असं स्पष्ट होईल.
8. अशी परिस्थिती तेव्हाच निर्माण होते, जेव्हा तुमची गणना आयकर विभागाच्या गणनेशी जुळत नसेल.