IT क्षेत्रातील फेशियर्ससाठी खुशखबर! हीच शेवटची संधी आजच या लिंकवर क्लिक करून अर्ज करा

IT क्षेत्रात नोकऱ्यांची मोठी संधी, हीच शेवटची संधी आजच या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.

Updated: Dec 20, 2021, 10:01 PM IST
IT क्षेत्रातील फेशियर्ससाठी खुशखबर! हीच शेवटची संधी आजच या लिंकवर क्लिक करून अर्ज करा title=

नवी दिल्ली : कोरोना काळात ज्यांची नोकरी गेली आहे किंवा जे नोकरीच्या शोधात आहेत. याशिवाय जे फ्रेशिअर्स आहे अशा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. IT क्षेत्रामध्ये मोठ्या नोकरीच्या संधी आहेत. जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे. 

नव्या तरुणांसाठी TCS ने नोकरीच्या संधी काढल्या आहेत. त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार, अर्ज कसा करायचा आणि अटी काय आहेत याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर आजच करा. 

BPS चा भाग म्हणून नोकरीच्या संधींसाठी अर्ज करणारे इच्छुक उमेदवारांचं B.Com पूर्ण असणं आवश्यक आहे. भूमिका म्हणून अर्ज करण्यासाठी बीए, बीबीए, बीसीएस, बीसीए किंवा इतर संबंधित पदवी अभ्यासक्रम. 2022 मध्ये पदवी पूर्ण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

इच्छुक उमेदवारांनी tcs.com/careers या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जानेवारी आहे. तर या सर्व उमेदवारांची परीक्षा 26 जानेवारी रोजी होणार आहे. 

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर अॅप्टिट्युट टेस्ट असेल. त्यानंतर मुलाखत घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेचा कालावधी 60 मिनिटं असणार आहे. लेखी परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांना मुलाखत आणि इतर सर्व परीक्षांना बसता येईल. 

इच्छुक उमेदवारांनी या वेबसाईटवर अर्ज करा. https://nextstep.tcs.com/campus/#/ या वेबसाईटवर आधी तुम्हाला तुमचं प्रोफाईल तयार करावं लागणार आहे. त्यासोबत लॉग इन देखील तयार करावं लागेल. 

या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला अर्ज भरता येणार आहे. फोटो आणि तुमची सही असे दोन्ही फोटो देखील अपलोड करावी लागणार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला वेळ जाणार असून लवकर अर्ज करणं गरजेचं आहे.