चांद्रयान -2 बाबत चंद्रावरुन आली आनंदाची बातमी

इस्रोसह भारतीयांच्या ही आशा प्रफुल्लीत

Updated: Sep 9, 2019, 02:28 PM IST
चांद्रयान -2 बाबत चंद्रावरुन आली आनंदाची बातमी title=

मुंबई : अपघातानंतरही विक्रम लँडर सुस्थितीत असल्याचं इस्रोने म्हटलं आहे. विक्रमशी संपर्क अद्याप झालेला नसला तरी होणारच नाही असंही नाही. विक्रम लँडर ज्या स्थितीत उतरायला हवा त्या स्थितीत उतरला नाही. लँडर एकसंध असल्याचं इस्रोने म्हटलं आहे. विक्रम लँडर एका बाजूनं झुकलेल्या स्थितीत असल्याचं देखील इस्रोने म्हटलं आहे. 

चांद्रयान-2 मधील विक्रम हे सुस्थितीत असल्याने संपर्क होईल अशी आशा इस्रो आणि संपूर्ण भारतीयांना आहे. इस्रो या लँडर सोबत संपर्क करण्यासाठी प्रयत्न करत आहे. शनिवारी चंद्रापासून फक्त 2.1 किलोमीटरवर असताना लँडरचा संपर्क तुटला होता.

रविवारी ISRO ने चंद्रावर हा लँडर नेमका कोठे आहे. याचा शोध लावला आहे. चांद्रयान 2 हे 95 टक्के यशस्वी ठरलं आहे. यश मिळण्यासाठी फक्त 2 किलोमीटरचं अंतर बाकी असताना लँडरचा संपर्क तुटला. यानंतर इस्रोचे चेअरमन के सिवन यांना देखील अश्रृ अनावर झाले होते. पण इस्राने केलेल्या या कामगिरीचं देशभरातून कोतुक होत आहे.