वाहननिर्मिती क्षेत्रात मंदीची लाट; चारचाकी वाहनांच्या विक्रीत ४१ टक्क्यांची घट

अनेक राज्यांनी जीएसटीचे दर कमी करायला विरोध दर्शवला आहे.

Updated: Sep 9, 2019, 02:02 PM IST
वाहननिर्मिती क्षेत्रात मंदीची लाट; चारचाकी वाहनांच्या विक्रीत ४१ टक्क्यांची घट title=

नवी दिल्ली: वाहन उद्योगात मंदीची मोठी लाट पसरल्याचे पहायला मिळत आहे. प्रवासी वाहतुकीच्या  वाहनांच्या विक्रीत ऑगस्टमध्ये मोठी घट आली असून गाड्यांच्या विक्रीत तब्बल ४१ टक्के घसरण झाली आहे. तर दुचाकी गाडयांच्या विक्रीतही घसरण पहायला मिळत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांची घट वाहन उद्योगात पहायला मिळत आहे. मंदीचा मोठा फटका हा वाहन उदयोगाला बसला आहे. 

वाहननिर्मिती क्षेत्राकडून सध्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) कमी करण्याची मागणी होत आहे. येत्या २० तारखेला होणाऱ्या जीएसटी परिषदेत यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. मात्र, जीएसटी कर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकाराला एकट्याने घेता येणार नाही, असे अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी स्पष्ट केले होते. 

जीएसटी परिषदेमध्ये राज्य सरकारचे प्रतिनिधी सामील असतात. त्यामुळे हा निर्णय राज्यांच्या मर्जीवर अवलंबून असतो. अनेक राज्यांनी जीएसटीचे दर कमी करायला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे २० सप्टेंबरच्या बैठकीत काय निर्णय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. सरकारने वाहननिर्मिती क्षेत्रासाठीचा जीएसटी कमी केला तरी त्याचे परिणाम दिसण्यासाठी आणखी काही दिवस जातील. त्यामुळे तुर्तास पडून असलेली वाहने विकण्याचे आव्हान वितरकांसमोर आहे. 

खुशखबर! स्टेट बँकेकेडून व्याजदरात पाचव्यांदा कपात

ही परिस्थिती कायम राहिल्यास आगामी काळात वाहनविक्रीचा आलेख आणखी मंदावू शकतो. त्यामुळे मंदीला पोषक वातावरण निर्माण होईल. परिणामी सरकार आता वाहननिर्मिती क्षेत्राला अडचणीतून कशाप्रकारे बाहेर काढणार, याकडे उद्योग जगताचे लक्ष लागले आहे. 

मोदी सरकारच्या सर्वव्यापी गैरव्यवस्थापनामुळे अर्थव्यवस्था संकटात- मनमोहन सिंग