श्रीहरिकोटा : संपूर्ण भारतीय बनावटीच्या जीसॅट-७-एचे थोड्याच वेळात प्रक्षेपण करण्यात आले. या नव्या उपग्रहामुळे भारतीय वायुसेनेची महत्वाची रडार यंत्रणा आणखी सक्षम होण्यास मदत झाली आहे.
#WATCH: Communication satellite GSAT-7A on-board GSLV-F11 launched at Satish Dhawan Space Centre in Sriharikota. pic.twitter.com/suR92wNBAL
— ANI (@ANI) December 19, 2018
आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन केंद्रातील ३९वा संदेशवहन उपग्रह जीसॅट ७ ए अवकाशात पाठवण्याची तयारी पूर्ण झाली. त्याचं काऊंट डाऊन सुरू होते. संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी उपग्रहाचे प्रक्षेपण झाले आहे. हा उपग्रह २२५० किलो वजनाचा असून तो भूस्थिर कक्षेत ८ वर्ष काम करणार आहे.
GSLV MK २ या रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण होणार असून २०१८ मध्ये या रॉकेटद्वारे इस्रोचे हे सातवे प्रक्षेपण असेल. जीसॅट ७ ए हा भारतीय वायूसेनेच्या युद्ध सज्जतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जातोय. उपग्रह प्रमुख्यानं संदेश वहनासाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे शत्रूशी लढताना वायूसेनेचे संदेश वहन सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे.