नवी दिल्ली : इस्त्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारत आणि इस्त्रायलमधील ९ करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
यामध्ये गुंतवणूक, सुरक्षा आणि इंटरनल टेक्निक यासंबंधी करार झाले. एविएशन सेक्टर आणि आयुर्वेद होमिओपॅथीसंबंधी करार झाला.
Delhi: Israel PM #BenjaminNetanyahu and wife Sara Netanyahu at Rajghat pic.twitter.com/E02bhC1OJ8
— ANI (@ANI) January 15, 2018
१) २०१७ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या इस्त्रायल दौऱ्या दरम्यान सायबर सेक्युरिटी करारावर चर्चा होऊ शकते.
२)दोन्ही देशात पहिल्यांदाच तेल आणि गॅस क्षेत्रात गुंतवणूक होऊ शकते.
३) पुनरुत्पादित उर्जेवर भारताला नवे तंत्रज्ञान इस्त्रायलकडून मिळण्याची शक्यता आहे.
४) दोन्ही देशांदरम्यान उड्डाण क्षेत्र विस्ताराशी संबंधित स्वाक्षऱ्या होऊ शकतील.
५) सिनेमाच्या शूटींगना प्रोत्साहन देण्यासाठी करार होऊ शकतो.
६) एकमेकांच्या गुंतवणूकदारांना चालना आणि सुरक्षा देण्याच्या दृष्टीने करार होऊ शकतो.
७) दोन्ही देशांदरम्यान हत्यार खरेदीसंबंधी करारावर स्वाक्षऱ्या होऊ शकतील.
काल प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान मोदी नेतन्याहू यांचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. आज नेतन्याहू पीएम मोदींना रिटर्न गिफ्ट देऊ शकतात. आज मोदी आणि नेतन्याहू यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. ज्यामध्ये अनेक करार होणार आहेत.
भारत दौऱ्याच्या दूसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता राष्ट्रपती भवनमध्ये नेतन्याहू यांचं स्वागत होणार आहे. 10.30 वाजता महात्मा गांधींना ते श्रद्धांजली वाहणार आहेत. दुपारी 12 वाजता नेतन्याहू आणि पीएम मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. 5.45 वाजता नेतन्याहू राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.
पंतप्रधान नेतन्याहू यांचा हा दौरा आणि 6 महिन्यात दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी भेट दोन्ही देशांच्या संबंधाना आणखी मजबूत करतील.
दोन्ही देशांमधील मैत्रीच्या 25 व्या वर्षात पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांची ही भेट भारताच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. इस्राईल आपलं तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन भारताला देखील देईल अशी आशा आहे.
आज होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेत भारताकडून रद्द करण्यात आलेला 500 मिलिअन डॉलरचा स्पाइक अँटी-टँक गायडेड मिसाईल करार यावर देखील चर्चा होऊ शकते.