नवी दिल्ली : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचं लग्नाचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे. राजस्थानच्या उदयपुरमध्ये सध्या बॉलिवुड सेलिब्रेटींची रेलचेल पाहायला मिळतेय. अनेकांनी आपल्या चित्रीकरणाच्या तारखा पुढे ढकलल्या तर काहींनी रद्दही गेल्या. आमिर खान आणि पत्नी किरण राव, कैटरीना कैफ, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन, आई जया तसेच पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या सोबत इथे आलाय. करण जोहर, सलमान खान, परिणीति चोपड़ा, अनिल कपूर पत्नी सुनीता सोबत इथे दिसला.
बोनी कपूर आपली मुलगी जान्हवी आणि खुशी सोबत, सिद्धार्थ रॉय कपूर हा पत्नी विद्या बालन, जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचल, रोनी स्क्रूवाला आणि त्याची पत्नी जरीन, करिश्मा कपूर, वरुण धवन, करण टेकर आणि राल्फ- रूसोचे डिजाइनर तमारा राल्फ असे दिग्गज चेहरे या कार्यक्रमाची शोभा वाढवता दिसत आहेत.
आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या हिलरी क्लिंटन, नव विवाहित दाम्पत्य प्रियांका चोप्रा आणि निक जोनास, क्रिकेट स्टार सचिन तेंडुलकर- पत्नी अंजली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या चेहऱ्यांनीही कार्यक्रमाचे लक्ष वेधून घेतले.
WATCH: @BeingSalmanKhan matches steps with #AnantAmbani at #IshaAmbaniSangeet on #KoiMilGaya song..
.
.
.#IshaAmbaniWedding #IshaAmbaniPreWedding #AnandPiramal #AmbaniWedding pic.twitter.com/wd6ATcTKLJ— dna After Hrs (@dnaAfterHrs) December 9, 2018
ईशा अंबानीच्या संगीत कार्यक्रमात सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान, कॅटरीना कैफ आणि ऐश्वर्या राय बच्चन सहित अनेक स्टार्सने परफॉर्म केलं. या सोहळ्यातील एक व्हिडिए सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलाय.
यामध्ये मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी डान्स करताना दिसतोय तर त्याच्यामागे खुद्द सलमान खान बॅकग्राऊंड डान्सर आहे. शाहरूखच्या 'कोई मिल गया' गाण्यावर हा डान्स परफॉर्मन्स सुरू आहे.