IRCTC Zoop App : तुम्हाला ट्रेनमध्ये प्रवास करायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता ट्रेनमध्ये प्रवास करताना जेवण ऑर्डर करणं आधीपेक्षाही सोपं होणार आहे. भारतीय रेल्वेची केटरिंग सर्विस आणि टूरिझम अॅप IRCTC ने प्रवाशांना ही सुविधा दिली आहे आणि आता प्रवासी स्वतःच्या सीटवर जेवण ऑर्डर करू शकतात. तुम्ही जेवणाची ऑर्डर दिली की तुम्हाला गरम जेवण तुमच्या सीटवर पोहोचवलं जाईल. या सेवेसाठी IRCTC च्या फूड डिलव्हरीच्या Zoop ने या सुविधेसाठी Jio Haptik सोबत करार केला आहे. यामुळे प्रवाशांना व्हॉट्सअॅपवर चॅटबॉट सेवेची सुविधा मिळणार आहे.
व्हॉट्सअॅपवरून जेवण ऑर्डर करण्यासाठी प्रवाशांना फक्त पीएनआर नंबर लागणार आहे. प्रवासी पीएनआर नंबरद्वारे सहज जेवण ऑर्डर करू शकतात. विशेष म्हणजे जेवण ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही अॅपची गरज भासणार नाही.
फूड ऑर्डर केल्यानंतर तुम्ही चॅटमधूनच रिअल टाइम फूड ट्रॅकिंग करू शकाल. याशिवाय, तुम्हाला चॅटबॉटद्वारे फीडबॅक आणि ऑर्डर संबंधित सपोर्टची सुविधा देखील मिळेल. ट्रेनमधील प्रवासी फक्त UPI पेमेंट किंवा नेटबँकिंगद्वारे पेमेंट करू शकतील.
- सर्वातआधी, +91 7042062070 हा नंबर तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा.
- नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करा.
- तुम्ही ज्या नावाने हा नंबर सेव्ह केला आहे त्याचा चॅटबॉक्स उघडा आणि हाय टाइप करून पाठवा.
- 'Hi' टाईप करून पाठवल्यास तुमच्यासमोर अनेक ऑप्शन्स दिसतील.
- आता ऑर्डर फूड ऑप्शनवर क्लिक करा.
- यानंतर ऑपन असलेल्या विंडोमध्ये तुमचा पीएनआर क्रमांक भरा
- पीएनआर भरल्यानंतर तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे की नाही हे विचारलं जाईल.
- तुम्ही 'होय' वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला कोणत्या स्टेशनवर जेवण डिलिव्हरी करायचं आहे हे विचारलं जाईल.
- स्टेशनचे नाव निवडा आणि नंतर व्ह्यू आयटममधून तुम्हाला जे जेवण ऑर्डर करायचं असेल त्याचा फोटो सिलेक्ट करा.
- पेमेंटसाठी तुम्हाला दोन ऑप्शन्स मिळतील, एक कॅश आणि दुसरा ऑनलाइन यापैकी कोणत्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता.
- यानंतर तुम्हाला नाव विचारलं जाईल आणि मोबाईल नंबरसाठी कन्फर्मेशन घेतलं जाईल.
- त्याठिकाणी तुम्हाला होय 'हा' पर्याय निवडावा लागेल आणि त्यानंतर तुमचं जेवण ऑर्डर केलं जाईल.