चप्पल घालून बाईक चालवताय? थांबा नाहीतर शिक्षा झालीच समजा ...

बाईकस्वारांनो, ही बातमी एकदा वाचाच... 

Updated: Aug 26, 2022, 02:14 PM IST
चप्पल घालून बाईक चालवताय? थांबा नाहीतर शिक्षा झालीच समजा ...  title=
Challan stop Riding Bike In Slippers read new rule

Challan For Riding Bike In Slippers: सहसा कोणत्याही वाहनधारकांना त्यांच्याकडे असणाऱ्या वाहनासंबंधीच्या नियमांची कल्पना असतेच. नसेल, तर आताच हे सर्व नियम जाणून घ्या. कारण, चुकूनही काही नियमांची तुमच्याकडून पायमल्ली झाल्यास फक्त दंडवसुलीच नाही, तर तुमच्यावर थेट कारावासाची हवा खायची वेळही येऊ शकते. 

कोणत्याही लहानशा चुकीमुळं तुमच्या नावाचं चलान कापलं जाण्याची भीती बाळगायची नसेल तर वाहतूक नियमांची माहिती करुन घेणं हाच एकमेव पर्याय तुम्हाला यातून तारु शकतो. 

अशाच एका नियमाविषयी तुम्हाला फारशी माहिती नसावी. तुम्हाला माहितीये का, चप्पल किंवा स्लिपर घालून दुचाकी चालवण्याची परवानगी नाहीये. सध्याच्या वाहन अधिनियमात नमूद केल्यानुसार दुचाकी वाहन चालवताना पूर्णपणे बंद बूट घालणं गरजेचं आहे. असं न केल्यास 1000 रुपयाचं चलान कापलं जाऊ शकतं. 

तुम्हीही जर ही चूक करत असाल, अर्थात चप्पल घालून दुचाकी चालवत असाल तर आताच थांबा नाहीतर 1000 रुपयांची फोडणी बसलीच म्हणून समजा. 

वाचा : एक बर्गर खाल्ल्याने 9 मिनिटे, पिझ्झाने 8 मिनिटे आणि कोल्ड ड्रिंकने आयुष्यातील 13 मिनिटे होतात कमी

वाहतुकीचे असे बरेच नियम आहेत ज्यांच्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. पण, अपघात आणि दुर्घटना टाळणं हा या नियमांचा प्राथमिक हेतू असतो हे विसरुन चालणार नाही. त्यामुळं या नियमांकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका.