LIC Jeevan Tarun Policy: देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडे (Life Insurance Corporation) सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना आहे. ही विमा कंपनी लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वासाठी योजना सादर करते. यामध्ये गुंतवणूक करत तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची तरतूद करण्याच्या हेतूने गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे LIC च्या जीवन तरुण योजनेचा (LIC Jeevan Tarun Yojna) पर्याय आहे. मुलांच्या भविष्याच्या दृष्टीकोनातूनच ही योजना तयार करण्यात आली आहे.
LIC जीवन तरुण योजना Non Linked, Participating, Individual आणि Life Insurance बचत योजना आहे. ही योजना तुम्हाला सुरक्षा आणि सेव्हिंग अशा दोन्ही प्रकारच्या सुविधा देते. अनेक पालक मुलांचं शिक्षण तसंच इतर गरजा लक्षात घेता या योजनेत गुंतवणूक करतात. LIC जीवन तरुण योजनेत गुंतवणूक करायची असल्यास तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं वय किमान 90 दिवस असलं पाहिजे. 12 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांना ही योजना लागू नाही.
मूल २५ वर्षांचं झाल्यानंतर या योजनेंतर्गंत सर्व फायदे मिळतात. तुमचं मूल 20 वर्षांचं होईपर्यंत तुम्हाला हफ्ता भरायचा असतो. तुम्ही कमीत कमी 75 हजारांच्या Sum Assured साठी ही योजना घेऊ शकता. यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. जर तुम्ही मुलाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही योजना घेतली तर योजनेची मुदत किमान 5 लाख रुपयांच्या विमा रकमेसह 13 वर्षे असेल.
तुम्ही तुमच्या पाल्याच्या भवितव्यासाठी रोज 150 रुपयांची बचत करत जीवन तरुण योजनेत गुंतवणूक केली तर तुमचा वार्षिक प्रीमियम (Premium) 54000 रुपये असेल. अशाप्रकारे आठ वर्षातील तुमची एकूण गुंतवणूक 4 लाख 32 हजार असेल. यानंतर तुम्हाला गुंतवणुकीच्या रकमेवर 2 लाख 47 हजारांचा बोनस मिळेल. याशिवाय योजनेचा Sum Assured 5 लाख रुपये असेल. यानंतर तुम्हाला लॉयल्टी बोनस म्हणून 97 हजार रुपये मिळतील. अशाप्रकारे तुम्हाला एकूण 8 लाख 44 हजार 500 रुपये मिळणार.
तुम्ही या योजनेत वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा मासिक आधारावर प्रीमियम (Premium Payment) भरू शकता. एलआयसीने मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना तयार केली आहे. पालक मुलांचं शिक्षण, भविष्यातील तरतूद यांचा विचार करत या योजनेत गुंतवणूक करु शकतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने LIC कडे फार विश्वासार्हतेने पाहिलं जातं. यासाठीच यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फार आहे.