Hindenburg Vs Gautam Adani : कोण आहे Nathan Anderson? ज्याच्या एका रिपोर्टमुळं गौतम अदानींच्या श्रीमंतीचा डोलारा कोलमडला

Hindenburg Report on Gautam Adani :  एका Ambulance Driver नं गौतम अदानींना फोडला घाम; कोण आहे Hindenburg रिपोर्ट देणारा Nathan Anderson?

Updated: Feb 3, 2023, 10:53 AM IST
Hindenburg Vs Gautam Adani : कोण आहे Nathan Anderson? ज्याच्या एका रिपोर्टमुळं गौतम अदानींच्या श्रीमंतीचा डोलारा कोलमडला  title=
Who Is Nathan Anderson Whose Hindenburg Research report shook Gautam Adani

Hindenburg Report on Gautam Adani : (America) अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म  Hindenburg Research च्या एका अहवालामुळं (Indian Business Sector) भारतीय उद्योग जगतात जणू भूकंप आला. कारण, या अहवालामुळं (Adani Group) अदानी समुहाला जबर हादरा बसला. क्षणात या उद्योग समुहाच्या शेअर्सच्या किंमती कोसळल्या आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांचा श्रीमंतीचा डोलारा कोसळण्यास सुरुवात झाली. पहिला झटका तेव्हा होता ज्यावेळी या समुहानं 45 हजार कोटी रुपयांचं नुकसान सोसलं. पुढे हा आकडा वाढतच गेला. 

अदानी समुहामध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं Hindenburg Research च्या अहवालातून सांगण्यात आलं. या समुहानं कशाचीही तमा न बाळगता (shares scam) शेअर्समध्ये घोटाळा करून अनेक खात्यांमध्येही अफरातफर केल्याचा खुलासा या अहवालातून करण्यात आला. या अहवालानंतर लगेचच अदानी समुहाकडून 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ रद्द करण्याचा निर्णय तातडीनं घेतला गेला. 

Hindenburg Research आहे तरी काय? 

Hindenburg Research कडून आतापर्यंत अनेक घोटाळेबाज कंपन्यांची गुपितं उघड करण्यात आली. 2017 मध्ये नाथन एंडरसन (Nathan Anderson) यांनी याची सुरुवात केली होती. ही एक फॉरेन्सिक फायनेन्शिअल फर्म असून, इक्विटी, क्रेडिट आणि डिरेक्टीव्जवर नजर ठेवून असते. या कंपनीचं नाव 1937 मध्ये झालेल्या हाय प्रोफाईल हिंडनबर्ग एयरशिप प्रकरणावरून घेण्यात आलं. अमेरिकेतील न्यू जर्सी मॅचेस्टर टाऊनशिपमध्ये ही दुर्घटना घडली होती. 

सोप्या भाषेक सांगावं, तर हिंडनबर्ग कोणत्याही कंपनीत सुरु असणाऱ्या गैरव्यवहारांना समोर आणते. मॅन मेड डिजास्टर्स अर्थात मानवनिर्मित संकटांवर या कंपनीची करडी नजर असते. यामध्ये अकाऊंटिंगपासून Undeclarised transactions चाही समावेश असतो. 

कोण आहे अदानींना हादरवणारा नाथन एंडरसन? 

रॉयटर्सच्या माहितीनुसार नाथन एंडरसनं युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकट (University of Connecticut) मधून आंतरराष्ट्रीय व्यवसायक्षेत्रातील पदवी शिक्षण घेतलं. त्यानंतर FactSet Research Systems Inc या डेटा कंपनीत त्यानं काम केलं. नाथननं इस्राईलमध्ये रुग्णवाहिका चालक म्हणूनही काम केलं आहे. प्रचंड तणावात काम करण्याकडे त्याचा विशेष कल. हॅरी मार्कोपोलस हा त्याचा आदर्श. 

हेसुद्धा वाचा : Gautam Adani Family : लेकीसुना, नातवंडं.... सहकुटुंब सहपरिवार 'अदानी अ‍ॅण्ड सन्स' पहिल्यांदाच सर्वांसमोर 

मार्कोपोलस हे एक अॅनालिस्ट असून, त्यांनी बर्नी मेडॉफ (Bernie Madoff) च्या एका फसव्या योजनेला जगासमोर आणलं होतं. 2020 मध्ये Hindenburg नं निकोला कॉर्प (Nikola Corp) या इलेक्ट्रीक ट्रक मेकर कंपनीवर पैज लावत घसघशीत रक्कम जिंकली होती. असं करत करत Hindenburg नं 2017 पासून जवळपास 36 कंपन्यांमधील घोटाळे जगासमोर आणले. यात आता त्यांचा सध्याचा रोख हा अदानी समुहाच्या दिशेनं असल्याचं स्पष्ट दिसत आहे. 

अदानींची श्रीमंती लयास जातेय? 

हिंडनबर्ग अहवाल समोर आल्यापासून अदानी श्रीमंतांच्या यादीत खालीच घसरत असल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारी 64.7 अरब डॉलर्स संपत्तीसह ते जगातील श्रीमंतांच्या यादीत 16 व्या स्थानावर होते. पण अवघ्या 24 तासांत ते पाच क्रमांकांनी खाली घसरून थेट 21 व्या स्थानावर पोहोचले.