देशात कोरोना रुग्णांची संख्या ४६ लाखांवर; गेल्या २४ तासांत १,२०१ रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढातना दिसत आहे.   

Updated: Sep 12, 2020, 10:38 AM IST
देशात कोरोना रुग्णांची संख्या ४६ लाखांवर; गेल्या २४ तासांत १,२०१ रुग्णांचा मृत्यू title=

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासुन देशात दररोज ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण समोर आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या ४६ लाखांवर पोहोचली असून, गेल्या २४ तासांमध्ये ९७ हजार ५७० नव्या रूग्णांची नोंद झाली. तर १ हजार २०१ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४६ लाख ५९ हजार ९८५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ७७ हजार ४७२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ९ लाख ५८ हजार ३१६ रुग्णांवर उपचार सुरू असून ३६ लाख २४ हजार १९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या आता १० लाख १५ हजार ६८१ आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ७ लाख १५ हजार २३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत २८ हजार ७२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात २ लाख ७१ हजार ५६६ अॅक्टिव्ह केसेस आहेत.