नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 तील पहिल्या 10 धनिक उमेदवारांचे पुढे काय झाले याबद्दल चर्चा सुरु आहे. धनिक उमेदवारांचे निकाल आता समोर आले असून यातील पाच जणांनाच लोकसभेत जाण्याची संधी मिळाली आहे. तर 5 धनिक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. देशातील 10 सर्वात धनिक उमेदवारांमध्ये तीन आंध्र प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन आणि तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी एक एक उमेदवार होते. धनिक आणि विजयी उमेदवारांमध्ये काँग्रेसचे नकुल नाथ यांचे नाव आहे तर पराभुतांमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांचे नाव प्रमुख आहे.
देशातील सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये बिहारचे रमेश कुमार शर्मा हे पाटीलपुत्र या जागेतून अपक्ष लढले. यात त्यांचे डिपॉझीट जप्त झाले. त्यांना केवळ 1556 मतं मिळाली. रमेश कुमार यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपली संपत्ती 1107 कोटी असल्याचे जाहीर केले होते.
काँग्रेसचे उमेदवार विश्वेश्वर रेड्डी यांचा देशातील श्रीमंत उमेदवारांमध्ये दुसरा क्रमांक लागतो. त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. तेलंगणाच्या चेवेल्ला जागेतून टीआरएसच्या जी रंजीत रेड्डी यांनी त्यांना 14 हजार 317 मतांनी हरविले. अपोलो समुहाचे अध्यक्ष सी.प्रताप रेड्डी यांचे जावई विश्वेश्वर हे दुसरे धनिक उमेदवार ठरले. त्यांनी 895 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची घोषणा केली होती. ते गेल्यावर्षीच टीआरएस सोडून कॉंग्रेसमध्ये सामील झाले होते.
नकुल नाथ हे देशातील तिसरे धनिक उमेदवार ठरले. त्यांच्याकडे 660 कोटींची संपत्ती आहे. ते छिंदवाडा मतदार संघातून 37 हजार 536 मतांनी हरले.
कॉंग्रेसचे एच. वसंतकुमार हे 417 कोटी रुपयांच्या संपत्तीने देशातील चौथे धनिक उमेदवार ठरले. त्यांनी 2 लाख 59 हजार 933 मतांनी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांना मात दिली. ज्योतिरादित्य सिंधिया हे 374 कोटींच्या संपत्तीने देशातील पाचवे श्रीमंत उमेदवार ठरले. त्यांनी भाजपाच्या कृष्ण पाल सिंह यांना 1 लाख 25 हजार 549 मतांनी हरविले.
वीरा पोटलूरी वायएसआर हे कॉंग्रेसच्या तिकिटावर विजयवाडा येथून निवडणूक लढले. पण 8 हजार 726 मतांनी ते तेदेपा उमेदवाराकडून हरले. त्यांच्याकडे 347 कोटींची संपत्ती आहे. कॉंग्रेसचे उदय सिंह देशातील सातवे सर्वात श्रीमंत उमेदवार होते. ते बिहारच्या पूर्णिया जागेतून 2 लाख 63 हजार 461 मतांनी हरले. त्यांनी 341 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची घोषणा केली होती.
देशातील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये डी.के. सुरेश कॉंग्रेसच्या टिकिटावर बंगळुरू ग्रामीण येथून 2 लाख 6 हजार 870 मतांनी जिंकले. नववे श्रीमंत उमेदवार वायएसआर कॉंग्रेस पार्टीच्या केआरके राजा यांनी नासापुरम येथून 31 हजार 909 मतांनी विजय मिळवला. त्यांनी 325 कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली होती. सर्वाधिक श्रीमंतांमध्ये दहाव्या स्थानी जयदेव गल्ला 4 हजार 205 मतांनी जिंकले. त्यांनी गुंटूर जागेतून हा विजय मिळवला असून 305 कोटींच्या संपत्तीची घोषणा केली होती.