मुंबई : तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही ट्रेनचे तिकीट ऑनलाइन घेत असाल तर रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) कडून ऑनलाइन तिकीट खरेदी करणाऱ्यांसाठी आता नवीन नियम करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, आता तुम्हाला तिकीट बुक करण्यापूर्वी मोबाईल नंबर आणि ईमेल व्हेरिफिकेशन करावे लागेल. त्यानंतरच तुम्ही तिकीट बुक करू शकाल.
कोरोना संसर्गामुळे, ज्या प्रवाशांनी बऱ्याच काळापासून तिकीट बुक केले नाही त्यांच्यासाठी रेल्वेने नवीन नियम केले आहेत. अशा लोकांना IRCTC पोर्टलवरून तिकीट खरेदी करण्यासाठी प्रथम त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल सत्यापित करावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला तिकीट मिळेल.
IRCTC भारतीय रेल्वे अंतर्गत तिकिटांची ऑनलाइन विक्रीदेखील करते. प्रवासी तिकिटांसाठी या पोर्टलवर लॉगिन आणि पासवर्ड तयार करतात. या पोर्टलच्या माध्यमातून तुमचा ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक सत्यापित करून, तुम्ही टिकिटांची बुकिंग करू शकता.
कोरोनाचा कहर कमी होताच रेल्वे नियमित सुरू झाल्या आहेत. अशा स्थितीत तिकीट विक्रीही वाढली आहे. आयआरसीटीसीच्या दिल्ली मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना संसर्गाची पहिली आणि दुसरी लाट आणि त्यापूर्वी पोर्टलवर निष्क्रिय असलेली खाती यांची सत्यता तपासण्यासाठी करण्यासाठी मोबाइल नंबर आणि ईमेल पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.