मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे आज कॉंग्रेसने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन सुरू केले. परंतू भाजपनेही कॉंग्रेसच्या आंदोलनाला आक्रमक उत्तर देत आक्रमक पवित्रा घेतला आहे. कॉंग्रेसनेते अतुल लोंढे आणि इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्रात भाजप विरुद्ध काँग्रेस संघर्ष पेटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत महाराष्ट्राचा अपमान केल्याचे सांगत, त्याच्या निषेधार्थ देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आज काँग्रेसने आंदोलन सुरू केले. याठिकाणी भाजप आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आणि इतर कार्यकर्ते पोहचले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. परंतू कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन लोंढे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
राज्यात भाजप आणि कॉंग्रेसमधील संघर्ष वाढत असल्याचे दिसून येते आहे.
राज पुरोहित, मंगल प्रभात लोढा, कृपाशंकर सिंह, राजहंस सिंह, प्रसाद लाड आणि आशिष शेलार हे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर पोहचले.