मुंबई : दूरच्या प्रवासासाठी स्वस्त आणि मस्त प्रवास म्हणजे रेल्वे प्रवास. अनेक जण लांबच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवासाला पसंती देतात. रेल्वेला प्रवास भाड्यातून आणि मालवाहतूकीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं. पण रेल्वेला कमाईचा आणखी एक मार्ग आहे. ज्या मार्गे भारतीय रेल्वेची चक्क 100 कोटींपेक्षा अधिक कमाई झाली आहे. (Indian Railways Northern Railway has collect more than Rs 100 crore on fine from passengers who traveling by train without tickets)
प्रवाशांचा प्रवास हा सुखकर व्हावा, यासाठी रेल्वेकडून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र काही प्रवासी हे असेही असतात की ज्यांना पैसे खर्च न करता फुकटात प्रवास करण्याची हौस असते.
कधी कधी विनातिकिट प्रवास करण्याचं कारण योग्य असतं. पण काही जण हे जाणीवपूर्वक विनातिकीट प्रवास करतात. अशा फुकट प्रवाशांकडून भारतीय रेल्वेने 100 कोटींपेक्षा अधिक रक्कम वसूल केली आहे.
100 कोटींपेक्षा अधिक वसूल
उत्तर रेल्वेने एप्रिल 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीदरम्यान 100 कोटींपेक्षा अधिक रक्कम ही दंड स्वरुपाक आकारली आहे. रेल्वेने विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध एका अभियान सुरु केलं होतं. या अभियानाअंतर्गत ही मोठी रक्कम दंडस्वरुपात जमा करण्यात आली आहे.
रेल्वे महाप्रबंधकांची माहिती
उत्तर रेल्वेचे महाप्रबंधक आशुतोष गंगल यांनी याबाबतची माहिती दिली.
"आम्ही आमच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर 1 एप्रिल ते 5 डिसेंबर दरम्यान एक विशेष मोहिम राबवली. या मोहिमेदरम्यान आमच्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रवाशी हे विनातिकीट सापडले. या अशा प्रवाशांकडून दंड आकारण्यात आला. या माध्यमातून रेल्वेच्या तिजोरीत 100 कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. तसेच ही मोहिम पुढेही अशाच प्रकार सुरु राहिल", असं गंगल म्हणाले.
कोरोना काळात मास्क बंधकारक करण्यात आला. यानंतरही काही प्रवाशी हे मास्क घालत नाहीत. अशा विनामास्क प्रवाशांकडून दंड स्वरुपात 26 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
सणोत्सवाच्या काळात अनेकांना रेल्वे तिकीट मिळत नाही. त्यामुळे अनेक जण हे विनातिकीट प्रवास करतात. अशाच एकूण 1 कोटी 42 लाख प्रवाशांवर रेल्वेच्या दिल्ली विभागाने कारवाई केली. या दंडात्मक कारवाईतून 8 कोटी 10 लाख रुपये वसूल करण्यात आले.
दंडात्मक रक्कम किती असते?
विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्यांकडून 250 ते 1 हजारापर्यंत दंडाची रक्कम वसूल केली जाते. दंडाव्यतिरिक्त कारावासाची शिक्षाही भोगावी लागते. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वेच्या पहिल्या ते शेवटच्या स्थानकापर्यंतच्या तिकीटाची रक्कम वसुल केली जाते.
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवासांकडून वर्षनिहाय आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम
वर्ष दंडाची रक्कम
2018-19 62.77
2019-20 77.3014
2020-21 10065.14