Indian Railway ची मोठी घोषणा, या लोकांना आता ट्रेनने प्रवास करता येणार नाही

 रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

Updated: Jan 11, 2022, 04:22 PM IST
Indian Railway ची मोठी घोषणा, या लोकांना आता ट्रेनने प्रवास करता येणार नाही title=

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याची योजना आखत असाल, तर जाणून घ्या तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करू शकणार नाही. होय तुम्ही हे बरोबर वाचलात. देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाची प्रकरणे पाहता रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये रेल्वेनं सांगितलं आहे की, 10 जानेवारीनंतर कोणाला ट्रेनमध्ये प्रवास करता येणार आहे आणि कोणाला करता येणार नाही.

झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, त्यात असे सांगण्यात आले आहे की,  ज्या लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत, तेच लोक 10 जानेवारीनंतर ट्रेनमधून प्रवास करु शकतात.

ज्या लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले नाहीत किंवा ज्या लोकांचा कोरोनाचा एकच डोस झाला आहे, त्यांना ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही. परंतु हे लक्षात घ्या की आत्तापर्यंत अशी मार्गदर्शक तत्त्वे केवळ दक्षिण रेल्वेनेच जारी केली आहेत.

याशिवाय, दक्षिण रेल्वेच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रेल्वेच्या आवारात मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना 500 रुपये दंडही भरावा लागणार आहे. तामिळनाडूमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता तेथील रेल्वे विभागाने ६ जानेवारी रोजी एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

उपनगरीय रेल्वे सेवा 50 टक्के क्षमतेने चालवली जाईल, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका नाही, असे रेल्वेने सांगितले आहे. याशिवाय प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना कोरोनाचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. प्रमाणपत्राशिवाय तुम्ही प्रवास करू शकणार नाही.

यापूर्वी रेल्वे मास्क न लावणाऱ्या लोकांसाठी 100 रुपयांचा दंड होता, पण ओमिक्रॉनच्या वाढत्या केसेस पाहता पश्चिम रेल्वेने हा दंड वाढवून 500 रुपये केला आहे.