Corona Home Isolation : कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी प्राणायाम आणि योगाचे वर्ग सुरू करणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली.
कोरोना बाधितांसाठी योगाचे वर्ग
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सांगितलं की गेल्या दोन दिवसांत दिल्लीत कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आगामी काळातही हा ट्रेंड कायम राहील, अशी आशा आहे. पण आता ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि जे होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही एक चांगला कार्यक्रम घेऊन आलो आहोत.
योग-प्राणायामामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. जे होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांच्यासाठी आम्ही ऑनलाइन योग वर्ग सुरू करत असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.
योग वर्गासाठी नोंदणी कशी करावी?
होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण घरी बसूनच योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग करु शकणार आहेत. यासाठी योग प्रशिक्षकांची मोठी टीम तयार करण्यात आली आहे. कोणते योग प्रकार कोरोनाशी संबंधित आहेत. याचं विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. जे होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांना नोंदणीसाठी लिंक पाठवली जाईल. लिंकवर क्लिक करून ते सांगू शकतील की त्यांना कोणत्या वेळी योगा करायला आवडेल? अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.
एका दिवसात योगाचे किती वर्ग असतील?
सकाळी 6 ते 11 या वेळेत प्रत्येकी एक तासाचे 5 योग वर्ग होतील. त्यानंतर संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत 3 योग वर्ग होतील. एकूण 8 वर्ग असतील. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्यासाठी नोंदणी करू शकता. 40 हजार लोक एकत्र योगाचे वर्ग घेऊ शकतात, एका वर्गात फक्त १५ लोक एकत्र योग करतील, जेणेकरून योग प्रशिक्षक प्रत्येक व्यक्तीवर लक्ष केंद्रित करू शकेल.
सीएम केजरीवाल म्हणाले की, योग वर्गादरम्यान लोक योग प्रशिक्षकांशी देखील बोलू शकतील. त्यांच्या मनात काही प्रश्न असल्यास ते त्यांना विचारू शकतील. आज लिंक सर्वांपर्यंत जाईल आणि उद्यापासून योगाचे वर्ग सुरू होतील.