Indian Railways: पुणेकरांनो तयारीला लागा.. होळीनिमित्त धावणार स्पेशल ट्रेन!

Indian Railway Holi Special Train: होळीच्या निमित्ताने (Special Train On Holi) प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. इतर राज्यात प्रवास करण्यासाठी जादा प्रवासी असल्याने रेल्वेने ही विशेष सेवा सुरू केली आहे. 

Updated: Feb 25, 2023, 04:39 PM IST
Indian Railways: पुणेकरांनो तयारीला लागा.. होळीनिमित्त धावणार स्पेशल ट्रेन! title=
Holi Special

Indian Railway Holi Special Train:​ वसंताच्या आगमनाची चाहूल लागतानाच साजरा होणारा सण म्हणजे होळीचा (Holi) सण. देशभरात होळी उत्साहात साजरी होती. होळीनिमित्त अनेकजण प्रवास करतात. अशातच होळीच्या निमित्ताने (Special Train On Holi) प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वेने विशेष गाड्या (IRCTC Holi Special Train) चालवण्याची घोषणा केली आहे. 

प्रवाशांची सोय सुधारण्यासाठी आणि होळीच्या सणाच्या दिवशी विशेष गाड्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, केरळ आणि इतर राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी जादा प्रवासी असल्याने रेल्वेने ही विशेष सेवा सुरू केली आहे. वाहतूक कमी करण्यासाठी विशेष गाड्या (holi special train 2023) चालवल्या जातील.

होळीनिमित्त पुण्यासाठी स्पेशल ट्रेन (Holi Special Train)

बरौनी ते पुणे (barauni pune special train) साप्ताहिक होळी स्पेशल ट्रेन 9 मार्च आणि 16 मार्च 2023 रोजी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही गाडी अनेक स्थानकांवर थांबून रात्री साडेदहा वाजता पुण्याला पोहोचणार आहे. तर त्यानंतर 11 मार्च आणि 18 मार्च रोजी शनिवारी ही ट्रेन पुण्याहून दुपारी 1 वाजता बरौनीसाठी सुटेल. त्यामुळे आता पुणेकरांचा आनंद गगनाच मावेना झालाय.

इतर विशेष गाड्या - 

1. गाडी क्र. 01459 - लोकमान्य टिळक- मडगाव- रविवार, 26 फेब्रुवारी 05 मार्च आणि 12 मार्च रोजी लोकमान्य टिळक येथून विशेष 22:15 वाजता सुटेल. ट्रेन मडगाव जंक्शनला पोहोचेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता पोहोचेल.

2. गाडी क्र. 01448 - करमाळी - पनवेल विशेष गाडी शनिवार, 25 फेब्रुवारी, 04 मार्च, 11 मार्च आणि 18 मार्च रोजी करमाळी येथून 09:20 वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी 20:15 वाजता पनवेलला पोहोचेल.

स्पेशल ट्रेनचं तिकीट 30 टक्क्यांनी स्वस्त

होळीच्या दिवशी पूर्वांचल आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटांसाठी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने विशेष ट्रेनच्या नावाखाली 30 टक्क्यांपर्यंत भाडे वाढवले ​​आहे.

आणखी वाचा - Indian Railways: तुमच्या ट्रेन तिकिटाचं PNR स्टेटस चेक करायचंय? ही ट्रिक लक्षातच ठेवा!

करमाळी ते सुरत होळी निमित्त स्पेशल ट्रेन (Holi Special Train)

होळी (Holi 2023) सणाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने होळी विशेष गाड्या धावणार आहेत. यामध्ये गोव्यातील करमाळी रेल्वे स्थानक ते गुजरातमधील सुरत स्थानकापर्यंत या गाड्या असतील.

1. ट्रेन क्रमांक - 09193 - करमाळी सुपरफास्ट स्पेशल (Karmali Superfast Special)  सुरत, गुजरात येथून 7 मार्चला संध्याकाळी 7.50 वाजता सुटेल.

2.गाडी क्रमांक - 09194 - करमाळी-सुरत विशेष गाडी  (Karmali Surat Express)  8 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4.20 वाजता करमाळीहून सुटेल.