Train Ticket Refund: ट्रेनचं तिकीट रद्द केल्यास किती पैसे कापले जातात? जाणून घ्या भारतीय रेल्वेचे नियम

Indian Railway Ticket Refund Rules: ट्रेनचं तिकीट रद्द केल्यास पैसे रिफंड करण्यासंबंधी भारतीय रेल्वेने (Indian Railway) काही नियम आखले आहेत. तुमच्या तिकीटातून किती पैसे कापले जाणार (Train Ticket Cancellation Refund) हे तुम्ही कोणत्या वेळी तिकीट रद्द करत आहात त्यावर आणि तुमचा डबा कोणता होता (Coach Position) त्यावर अवलंबून असतं.    

Updated: Feb 25, 2023, 04:48 PM IST
Train Ticket Refund: ट्रेनचं तिकीट रद्द केल्यास किती पैसे कापले जातात? जाणून घ्या भारतीय रेल्वेचे नियम title=

Indian Railway Ticket Refund Rules: उन्हाळी सुटुट्या सुरु होत असल्याने तुम्हीही आपल्या कुटुंबासह गावाला किंवा बाहेर फिरायला जाण्याचा बेत करत असाल. प्रवास करण्यासाठी अनेकदा आपण खासगी वाहन किंवा मग रेल्वेचा (Indian Railway) पर्याय निवडतो. पण जर रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तिकीट मिळावं यासाठी फार आधी बुकिंग ( Indian Railway Ticket Booking) करावं लागतं. पण अनेकदा ऐनवेळी काही वेगवेगळ्या कारणांमुळे आपला बेत रद्द होतो आणि कंफर्म झालेलं तिकीट रद्द करावं लागतं. पण असं अचानक तिकीट रद्द केल्यास ( Indian Railway Ticket Cancellation) तुम्हाला तिकीटाचे पूर्ण पैसे परत मिळत नाहीत. मग आपल्याला नेमके किती पैसे मिळतात हे जाणून घ्या...

जर तुमचं तिकीट कंफर्म (Confirm), आरएसी (RAC) किंवा वेटिंगमध्ये (Waiting) सेल आणि रद्द करत असाल तर रेल्वे त्यातून काही पैसे कापून घेतं. रेल्वे किती चार्ज (Railway Charge) लावणार हे तुम्ही तिकीट कधी रद्द करत आहात त्यावर आणि तुमच्या डब्यावर (Coach Position) अवलंबून असतं. ट्रेन तिकीट रिफंडसंबंधी भारतीय रेल्वेचे नेमके काय नियम (Railway Ticket Refund Rules) आहेत जाणून घ्या....

ट्रेनची यादी तयार होण्याआधी ई-तिकीट रद्द करावं लागेल?(IRCTC Train Ticket Cancellation Charges)

1 - जर तुमचं तिकीट कंफर्म असेल आणि प्रवासाच्या 48 तास आधी तुम्ही ते रद्द केलं तर एसी फर्स्ट क्लास/ एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 240 रुपये आकारले जातात. एसी 2 टियर/फर्स्ट क्लाससाठी हा दंड 200 रुपये; तर एसी 3 टियर / एसी चेअर कार / एसी 3 इकॉनॉमीसाठी 180 रुपये चार्ज लावला जातो. सेकंड क्लाससाठी चार्ज 60 रुपये आहे. 

2 - जर एखाद्या प्रवासाने ट्रेनच्या वेळेच्या 48 तासांपेक्षा कमी आणि 12 तासांच्या आधी कंफर्म तिकीट रद्द केलं तर अशावेळी तिकिटातून 25 टक्के पैसे कापले जातात. 

3 - ट्रेनच्या निर्धारित वेळेच्या 12 तासापेक्षा कमी आणि 4 तास आधी तिकीट रद्द केल्यास तुमच्या तिकिटातून 50 टक्के रक्कम कापली जाते. म्हणजे तुम्हाला तुमच्या तिकिटातील अर्धे पैसेच परत मिळतात. 

4 - आरएसी / वेटिंग लिस्टमध्ये जर तुम्ही ट्रेन सुटण्याच्या अर्धा तास आधी तिकीट रद्द केलं तर तुम्हाला पूर्ण पैसे रिफंड म्हणून मिळतात. 

ट्रेनची यादी तयार झाल्यानंतर तिकीट रद्द कसं करायचं?

सामान्य प्रवाशांसाठी ट्रेनची यादी तयार झाल्यानंतर ई-तिकीट रद्द होत नाही. 

प्रवाशांनी शक्यतो ऑनलाइन टीडीआरचा वापर केला पाहिजे अशी विनंती आहे. तसंच आयआरसीटीसीच्या ट्रॅकिंग सर्व्हिसच्या माध्यमातून तुमच्या रिफंडची माहिती घेऊ शकता.