सलाम... लष्कराच्या अभियंत्यांनी गलवान नदीवर अवघ्या ७२ तासात उभारला पूल

हिंसक झटापटीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळीच भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी वेगाने पूल उभारणीचे काम सुरू केले. 

Updated: Jun 21, 2020, 10:42 PM IST
सलाम... लष्कराच्या अभियंत्यांनी गलवान नदीवर अवघ्या ७२ तासात उभारला पूल title=

नवी दिल्ली: लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनशी झालेल्या संघर्षानंतर भारतीय लष्कराने अभिमानास्पद कामगिरी करुन दाखविली आहे. १५ आणि १६ जूनला या भागात झालेल्या तुंबळ हाणामारीनंतर या परिसरात तणावाचे वातावरण होते. मात्र, अशा परिस्थितीत आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत भारतीय लष्कराने गलवान नदीवरील नियोजित पूलाचे काम पूर्णत्त्वाला नेले. 

गलवान खोऱ्यातील परिस्थितीविषयी शरद पवारांचा मोदी सरकारला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले...

हिंसक झटापटीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळीच भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी वेगाने पूल उभारणीचे काम सुरू केले. कुठल्याही परिस्थिती आहे त्या साधनांच्या उपयोग करून कमीत कमी वेळात हा पूल उभारण्याचे आदेश होते. मंगळवारी आणि बुधवारी रात्री अत्यंत कडाक्याच्या थंडीतही या पुलाचे बांधकाम सुरु होते. मात्र, तरीही भारतीय अभियंत्यांनी कोणतीही तमा न बाळगता अवघ्या ७२ तासांत पूलाचे काम पूर्ण केले. गुरुवारी दुपारी या पूलाचे काम पूर्ण झाले.

'त्या' झडपेत चीनी कर्नल होता भारताच्या ताब्यात?

गलवान खोऱ्यात ज्या ठिकाणी संघर्ष झाला तिथून काही किलोमीटर अंतरावरच हा पूल उभारण्यात येत होता. ६० मीटर लांबीच्या या पुलामुळे भारतीय लष्कराच्या तुकडयांना अत्यंत वेगाने नियंत्रण रेषेजवळ पोहोचता येईल. याशिवाय, भारतीय लष्कराकडून श्योक नदीवरही पूल बांधण्यात येत आहे. या पुलाचे बांधकामही वेगाने सुरू आहे. या पूलाच्या बांधकामालाही चीनचा आक्षेप आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर भारतीय लष्कराला गलवान खोऱ्यात मुक्तपणे संचार करणे शक्य होणार आहे.