कोरोनाचा या क्षेत्राला सर्वाधिक फटका, इतके लाख लोक बेरोजगार

जवळपास 20 लाख लोक बेरोजगार झाल्याची माहिती समोर येत आहे.

Updated: Jun 21, 2020, 09:57 PM IST
कोरोनाचा या क्षेत्राला सर्वाधिक फटका, इतके लाख लोक बेरोजगार title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : बस आणि ट्रक चालक संघटना बीओसीआयनुसार, कोरोना व्हायरसमुळे बस-टॅक्सी क्षेत्रात जवळपास 20 लाख लोक बेरोजगार झाल्याची माहिती समोर येत आहे. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, आणखी अनेक लोक बेरोजगार होण्याचा धोका असल्याचं सांगितलं आहे. Bus Operators Confederation of India (बीओसीआय) 15 लाख बस, मॅक्सी कॅब आणि 11 लाख पर्यटन टॅक्सी चालवणाऱ्या, 20 हजार ऑपरेटर्सच्या प्रतिनिधित्वाचा दावा केला आहे. 

संघटनेने दाव केला आहे की, हे ऑपरेटर्स एक कोटी लोकांना रोजगाराच्या संधी पुरवतात. या कठीण काळात खासगी ऑपरेटरकडून कर सवलत आणि कर्जाच्या व्याजमुक्तीसाठी सरकारकडून मदत मिळणे अपेक्षित असल्याचं सांगितलं आहे.

बीओसीआयचे अध्यक्ष प्रसन्ना पटवर्धन यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनदरम्यान आमच्या 95 टक्के गाड्या रस्त्यांवर नाहीत. काही कंपनीसाठी फारच थोड्या बसेस चालवल्या गेल्या, तर काही प्रवासी कामगारांच्या वाहतुकीसाठी वापरल्या गेल्या, असं ते म्हणाले.

कोरोनाचा धोका कायम, WHOकडून नव्या टप्प्याचा इशारा

व्यवसाय होत नसल्यामुळे कर्मचार्‍यांना पगार देण्यास अडचणी येत आहेत. एक कोटी लोकांपैकी किमान 30 ते 40 लाख लोक आपल्या नोकर्‍या गमावतील. तर 15 ते 20 लाख लोकांनी आधीच आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. उरलेल्या इतर कर्मचाऱ्यांचीही नोकरी जाऊ शकत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हेवेदावे थांबवून संयमी व्हा, रतन टाटा याचं भावनिक आवाहन