भारतीय अर्थव्यवस्थेची सातव्या स्थानावर घसरण

२०१७ साली भारतीय अर्थव्यवस्थेने या क्रमावारीत सहाव्या स्थानावर झेप घेतली होती.

Updated: Aug 2, 2019, 04:20 PM IST
भारतीय अर्थव्यवस्थेची सातव्या स्थानावर घसरण title=

नवी दिल्ली: जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्थेची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. इंग्लंड आणि फ्रान्सने भारताला मागे टाकत अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर झेप घेतली. जागतिक बँकेने शुक्रवारी यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली. 

२०१७ साली भारतीय अर्थव्यवस्थेने या क्रमावारीत सहाव्या स्थानावर झेप घेतली होती. त्यामुळे फ्रान्सची सातव्या स्थानावर घसरण झाली होती. मात्र, २०१८ मध्ये फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा हे स्थान परत मिळवले. 

तर २०.५ ट्रिलियन डॉलर्ससह अमेरिका प्रथम स्थानावर आहे. अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर चीन (१३.६ ट्रिलियन डॉलर्स) आहे. तर तब्बल ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

२०१८ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे मूल्य २.७ ट्रिलियन डॉलर्स इतके होते. तर इंग्लंड आणि फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचे मूल्य साधारण २.८ ट्रिलियन डॉलर्स इतके होते. 

आर्थिक संकटाच्या संकेतानंतर शेअर बाजारात पडझड

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने येत्या पाच वर्षांमध्ये पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्याचा मानस व्यक्त केला होता. मात्र, जागतिक बँकेच्या आकडेवारीने या मनसुब्यांना मोठा धक्का बसला आहे. 

गूगल, फेसबुक, ट्विटर या डिजिटल कंपन्या टॅक्सच्या जाळ्यात

आर्थिक वर्ष २०१७मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी २.६५ इतका होता. जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था होण्याचा मान भारताने मिळवला होता. मात्र, यानंतर रुपयाच्या स्तरातील चढ-उतारामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.