अमृतसर : करतापूर कॉरिडोर संदर्भात भारत आणि पाकिस्तान यांच्या प्रतिनिधींची पहिली बैठक गुरूवारी झाली. भारताकडून दररोज पाकिस्तानातील करतारपूर गुरद्वारा येथे जाणाऱ्या 5 हजार भाविकांना व्हिसामुक्त प्रवेश मिळावा असे भारतीय अधिकाऱ्याने सांगितले. पायी जाणाऱ्या भाविकांना करतारपूर गुरूद्वारा येथे जाण्यासाठी परवानगी दिल्ली जावी असे मत भारतातर्फे मांडण्यात आले. हा कॉरिडोर आठवड्यातील सातही दिवस खुला राहावा असेही यात म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अधिकाऱ्यांमध्ये रचनात्मक चर्चा झाल्याचे एका अधिकाऱ्याने आपल्या वक्तव्यात सांगितले. भारत आणि पाकिस्तानने करतारपूर कॉरिडोर लवकर सुरू करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकण्यात आले. खरेतर गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच भारत आणि पाकिस्तान करतारपूरमधील गुरूद्वारा दरबार साहिब यास भारतातील गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा गुरूद्वारास जोडण्यास कॉरिडोरसाठी सहमती मिळाली होती. करतारपूरमध्ये शिख पंथाचे संस्थापक गुरू नानक देव यांनी आपला शेवटचा काळ इथे व्यतित केला होता.
करतारपूर साहिब हे पाकिस्तानच्या नरोवाल जिल्ह्यातील रावी नदीच्या पलिकडे आहे. जे डेरा बाबा नानक गुरूद्वारापासून साधारण चार किलोमीटर दूर आहे. सरकारने करतारपूरसाठी 50 एकर जमिन दिली असून दोन चरणांमध्ये या जागेचा विकास होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.