भाजप 370, तर एनडीए 400 पार, मोदींचा नारा, तर काँग्रेसला टाळं लावण्याची वेळ.. वाचा भाषणातील ठळक मुद्दे

PM Modi Lok Sabha Speech: लोकसभेत राष्ट्रपाती द्रोपदी मुर्मु यांच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि इंदारी गांधी यांच्यावर टीका करताना पीएम मोदी यांनी यावेळी एनडीए 400 पार जागा जिंकेल अशी घोषणा केली. 

राजीव कासले | Updated: Feb 5, 2024, 06:53 PM IST
भाजप 370, तर एनडीए 400 पार, मोदींचा नारा, तर काँग्रेसला टाळं लावण्याची वेळ.. वाचा भाषणातील ठळक मुद्दे title=

PM Modi Lok Sabha Speech : आता काँग्रेसच्या दुकानाला टाळं लावण्याची वेळ आलीय. काँग्रेसनं एकच प्रॉडक्ट वारंवार लॉन्च केलं, अशी टोलेबाजी पंतप्रधान मोदींनी (PM Modi Speech) लोकसभेत केलीय. त्याचप्रमाणे विरोधकांमध्ये पुन्हा लढण्याची हिंमतच नाही, अशी टीकाही मोदींनी केलीय. मोदींनी लोकसभेत (Loksabha) राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिलं. पीएम मोदी यांनी काँग्रेसवर (Congress) पुन्हा एकदा घराणेशाहीच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनात सिंह यांना पीएम मोदी यांनी क्लीन चिट दिली. राजनाथ सिंग आणि अमित शाह यांचा  स्वत:चा कोणताही राजकीय पक्ष नाही. एकाच कुटुंबातील लोकं पक्ष चालवणं लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचं पीएम मोदी यांनी म्हटलंय. 

पीएम मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- विरोधकांनी जो संकल्प केला आहे त्याचं मी कौतुक करतो, यामुळे माझा आणि देशाचा विश्वास प्का झाला आहे की विरोधकांना मोठ्या कालावधीसाठी विरोधातच राहाण्याचा संकल्प केला आहे, पुढची अनेक दशकं त्यांना तिथेच बसायचं आहे, असा टोला पीएम मोदी यांनी विरोधकांना लगावला. विरोधाक ज्या प्रकारे मेहनत करत आहात, ते पाहता जनता तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल असा माझा ठाम विश्वास आहे. आणि तुम्ही ज्या उंचीवर आहात त्यापेक्षा जास्त उंचीवर तुम्ही नक्कीच पोहोचाल. पुढच्या निवडणुकीत विरोधक केवळ प्रेक्षक म्हणूनच पाहिला मिळतील असा टोलाही पीएम मोदींनी लगावला. 

विरोधक किती दिवस समाजात फूट पाडत राहणार?
विरोधक किती काळ समाजात फूट पाडत राहणार आहेत. या लोकांनी देशाचे खूप तुकडे केले आहेत. निवडणुकीचे वर्ष आहे, थोडे कष्ट करूयात. देशासाठी काहीतरी नवीन करुया, मी तुम्हाला शिकवतो असा निशाणा पीएम मोदी यांनी विरोधकांवर साधला. काँग्रेसला एक चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी मिळाली होती. यासाठी दहा वर्ष कमी नाहीत. पण यातही काँग्रेस सफल झालं नाही. जेव्हा ते स्वत: अपयशी ठरले त्यावेळी आपल्याच पक्षातील काही चांगल्या लोकांना त्यांनी दाबून टाकलं. त्यांचा उदय होऊ दिला नाही. एकप्रकारे त्यांनी स्वतःचे आणि विरोधकांचेही इतके मोठे नुकसान केलं. शिवाय संसद आणि लोकशाहीचं त्यांनी नुकसान केलं. 

घराणेशाहीचा फटका
घराणेशाहीचा जेवढा फटका देशाला बसला आहे, तेवढाच फटका काँग्रेसलाही बसला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.  मल्लिकार्जुन खरगे या सभागृहातून त्या सभागृहात गेले. गुलाम नबी यांनी पक्षातूनच पक्षांतर केले. हे सर्वजण घराणेशाहीचे बळी ठरले. तेच उत्पादन पुन्हा पुन्हा सुरू केल्यामुळे त्यांना स्वतःचं दुकान बंद करावं लागलं.

घराणेशाही लोकशाहीसाठी धोकादायक
देश घराणेशाहीने ग्रासला आहे. विरोधी पक्षात एकच कुटुंब पक्ष आहे. आमच्याकडे बघा, राजनाथ सिंग किंवा अमित शाह यांचा स्वत:चा राजकीय पक्ष नाही. जिथे  वळ एका कुटुंबाचा पक्ष सर्वोच्च असतो, ते लोकशाहीसाठी धोकादायक असंत. घराणेशाहीचं राजकारण हा आपल्या सर्वांच्या चिंतेचा विषय असायला हवा.

आम्ही म्हणतो मेक इन इंडिया काँग्रेस म्हणतं रद्द, आम्ही म्हणतो संसदेची नवी इमारत काँग्रेस म्हणतं रद्द.. मला आश्चर्य वाटतं की हे मोदींचे नाही तर देशाचे यश आहे. एवढा द्वेष किती दिवस ठेवणार? असा सवाल पीएम मोदी यांनी उपस्थित केला.

हम कहते हैं मेक इन इंडिया, कांग्रेस कहती है कैंसिल, हम कहते हैं, संसद की नई इमारत, कांग्रेस कहती है कैंसिल. मैं हैरान हूं कि ये मोदी की उपलब्धि नहीं है बल्कि देश की उपलब्धियां है. इतनी नफरत कब तक पाले रखोगे. 

काँग्रेसच्या संथ गतीला तोड नाही
आमचं लक्ष आणि ध्येय खूप मोठी आहेत. आज संपूर्ण जग हे पाहात आहे. काँग्रेसच्या संथ गतीला तोड नहाही.  आज देशात ज्या वेगाने काम सुरू आहे, त्याची कल्पनाही काँग्रेस सरकार करू शकत नाही. आम्ही गरीबांसाठी चार कोटी घरे बांधली. शहरी गरिबांसाठी 80 लाख पक्की घरे बांधण्यात आली आहेत. ही घरे काँग्रेसच्या गतीने बांधली असती तर एवढे काम पूर्ण व्हायला 100 वर्षे लागली असती. पाच पिढ्या निघून जातील.

आम्ही  10 वर्षांत 40 हजार किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण केलx. काँग्रेसच्या गतीने देश चालला असता तर हे काम पूर्ण व्हायला 80 वर्षे लागली असती. एक प्रकारे चार पिढ्या निघून गेल्या असतील. आम्ही 17 कोटी गॅस कनेक्शन दिले. आम्ही काँग्रेसचा मार्ग अवलंबला असता तर ही जोडणी देण्यासाठी आणखी 60 वर्षे लागली असती. आमच्या सरकारच्या काळात स्वच्छता कव्हरेज 40 टक्के ते 100 टक्के झाले आहे. काँग्रेसची वाटचाल झाली असती तर हे काम पूर्ण व्हायला अजून 60-70 वर्षे लागली असती आणि किमान तीन पिढ्या निघून गेल्या असत्या, पण त्यानंतरही शाश्वती नसती.

काँग्रेसच्या मानसिकतेमुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. काँग्रेसने देशाच्या सामर्थ्यावरही कधी विश्वास ठेवला नाही. ते स्वत:ला शासक मानत आले आणि नेहमी जनतेला कमी लेखत आलेत. 

नेहरु आणि इंदिर गांधींवर टीका
पहिल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून सांगितले होतं की, भारताला सामान्यतः कष्ट करण्याची सवय नाही. आम्ही युरोप, जपान किंवा चीन, रशिया किंवा अमेरिकेत जितके काम केले तितके काम केलं नाही. पण असं समजू नका की भारतीय एखाद्या जादूने सुखी झाले, ते कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेने सुखी झालेत. नेहरूजी भारतीयांना आळशी मानत. इंदिराजींची विचारसरणीही वेगळी नव्हती.अशी टीका पीएम मोदी यांनी केलीय. 

इंडिया आघाडीला टोला
काँग्रेस स्वतःला शासक समजते. ती एका कुटुंबाच्या पलीकडे विचार करू शकत नाही. काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीची बिघाडी झाली आहे. त्यांचा एकमेकांवर विश्वासही नाही. आमची पहिली टर्म त्यांनी खणलेले खड्डे भरण्यात गेली. दुसऱ्या टर्ममध्ये नव्या भारताचा पाया रचला. काँग्रेसच्या मानसिकतेमुळे देशाचे नुकसान झालं आहे.

अंतराळ ते ऑलिम्पिकपर्यंत महिला शक्ती
आता अंतराळ ते ऑलिम्पिकपर्यंत महिला शक्ती दिसत आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत अनेक दशकांपासून रखडलेल्या योजना वेळेत पूर्ण केल्या आहेत. इंग्रजांच्या काळात जुने कायदे रद्द करुन न्याय प्रक्रियेतही प्रगती केली आहे. आमच्या सरकारने असे शेकडो कायदे रद्द केले जे अप्रासंगिक बनले होते.

यावेळी भाजप 370, एनडीए 400 पार
भारताच्या महान परंपरेला ऊर्जा देणारं असे मंदिर देशात निर्माण झाले आहे, आमच्या सरकारची तिसरी टर्मही आता दूर नाही. केवळ 100-125 दिवस बाक आहेत. देशात पुन्हा एकदा अब की बार मोदी सरकार आहे. देशात यावेळी भाजप 370 जागांपेक्षा जास्त तर एनडीए 400 पेक्षा जास्त जागा मिळवेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.