मुंबई : गेल्या वर्षापासून संपूर्ण देश कोरोनाच्या गंभीर संकटाशी लढा देतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आलं. दरम्यान शुक्रवारपर्यंत देशात एकूण कोरोना लसींच्या ५० कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत. यानुसार कोरोना विरोधातील लढा अधिकच तीव्र करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे यामुळे लसीकरणामध्ये जगभरात भारत देश अव्वल आहे. देशात लाभार्थ्यांना 50 कोटी लसमात्रा देशातील कोरोना लस प्रशासन अधिक कार्यक्षम बनलं असून जुलै अखेर एकूण 13.45 कोटी डोस देण्यात आले आहेत. महिन्यात दिवसाला 43.41 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत, असं आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी शनिवारी सांगितलं.
‘सबको व्हॅक्सीन मुफ्त व्हॅक्सीन’ हॅशटॅगवर आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, लसीकरण वाढत असून जुलैमध्ये 19.45 कोटी मात्रा देण्यात आल्या. भारतात 50 कोटी 10 लाख 9 हजार 609 लसींचे डोस आतापर्यंत देण्यात आल्या. यासाठी 58,08,344 लस सत्रांचं आयोजन करण्यात आलं. आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय.
आहे की, गेल्या 24 तासांत 49 लाख 55 हजार 138 मात्रा देण्यात आल्या. केंद्र सरकारने लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवली असून दैनंदिन प्रमाणही वाढत असल्याचं, आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
गेल्या 24 तासांत देशात आणखी 38,628 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3,18,95,385 वर पोहचलीये. याच काळात 617 जणांचा कोरोनाने बळी घेतल्याने कोरोनामृत्यूचा आकडा 4,27,371 इतका झाला आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,12,153 इतकी कमी झाली असून, ही संख्या एकूण रुग्णांच्या 1.29 टक्के आहे. आतापर्यंत 3,10,55,861 लोक बरं झालं असून हे प्रमाण 97.37 टक्के आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे.