मुंबई : जगभरात भारत महिलांसाठी सर्वात धोकादायक देश आहे. थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशनच्या एका सर्वेनुसार, सर्वात असुरक्षित देशांच्या यादीत भारताला पहिल्या क्रमांकावर ठेवण्यात आलं आहे. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, युद्धाने जेरीस आलेले देश अफगाणिस्तान दुसऱ्या आणि सिरिया तिसऱ्या स्थानी आहे. महिलांसाठी धोकादायक देशांच्या यादीत पहिल्या १० मध्ये अमेरिका देखील आहे. या सर्वे महिलांच्या समस्यांशी संबंधित ५५० तज्ज्ञांद्वारा करण्यात आला आहे.
हा अहवाल भारतासाठी मोठा धक्का आहे. कारण ७ वर्ष आधी या अहवालात भारत सातव्या क्रमांकावर होता. सर्वेत महिलांची लैंगिक हिंसा, वेश्या व्यवसायात ढकलणे या आधारावर भारत महिलांसाठी धोकादायक देश असल्याचं सांगण्यात आलं आहे. महिला आणि बाल कल्याण विकास मंत्रालयाने, या सर्वेतील अहवालावर बोलण्यास नकार दिल्याचं रॉ़यटर्सने म्हटलं आहे. सरकारी आकड्यांनुसार २००७ आणि २०१६ मध्ये महिलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये ८३ टक्के वाढ झाली आहे.
भारत हा महिलांसाठी जगात सर्वात धोकायदाक देश आहे, कदाचित हा सर्वे आपल्या देशात सर्वांना पचणार नाही, पण या निमित्ताने का असेना, भारतातील महिलांची सुरक्षितता आणि अत्याचार यावर चर्चा जरूर होईल, पण चर्चेसोबतच यावर आपल्याला आत्मपरिक्षण करण्याची निश्चितच गरज आहे.
महिलांसाठी सर्वात धोकादायक देशांची यादी २०१८
१)भारत २) अफगाणिस्तान ३) सिरीया ४) सोमालिया ५) सौदी अरेबिया
महिलांसाठी सर्वात धोकादायक देशांची यादी २०१८
१) अफगाणिस्तान २) डेमोक्रिटिक रिपब्लिक ऑफ कांगो ३) पाकिस्तान ४) भारत ५) सोमालिया