कोरोना विरोधात लढण्यासाठी अनिल कुंबळेकडून गुप्तदान

किती रक्कम दिली हे त्याने जाहीर केले नाही.

Updated: Apr 1, 2020, 11:50 PM IST
कोरोना विरोधात लढण्यासाठी अनिल कुंबळेकडून गुप्तदान title=

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने कोरोना विरुद्धच्या लढाईत आर्थिक सहाय्य केले आहे. पंतप्रधान सहाय्यता निधी आणि कर्नाटक राज्य सहाय्यता निधीसाठी त्याने हे दान केले आहे. कोरोनाविरोधात आपल्या सर्वांना एकत्र येऊन लढावे लागेल. कृपया घरी राहा आणि सुरक्षित रहा असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. नेमकी किती रक्कम दिली हे त्याने जाहीर केले नाही.

याआधी टीम इंडीयाचा सलामी फलंदाज रोहीत शर्माने ८० लाखाचा आर्थिक निधी दिला.

यातील ४५ लाख हे पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी तर २५ लाख हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिेले. तसेच फिडींग इंडीया आणि श्वानांच्या सहाय्यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये दिले. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबद्दल माहिती दिली.

 

व्यावसायिकांचाही पुढाकार 

कोरोना वायरस विरोधात सुरु असलेल्या लढाईत विप्रो लिमिटेड, विप्रो एंटरप्राईस लिमिटेड आणि अजीम प्रेमजी फाऊंडेशन देखील उतरली आहे. त्यांनी संयुक्तरित्या १,१२५ कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ उभे केले आहे. बुधवारी यासंदर्भात माहिती देण्यात आली. 

यामध्ये विप्रो लिमिटेडने १०० कोटी रुपये, विप्रो एंटरप्रायझेसने २५ कोटी आणि अजीम प्रेमजी फाऊंडेशनने १ हजार कोटींचे योगदान दिले आहे. अजीम प्रेमजी फाऊंडेशनने दिलेले योगदा सीएसआर व्यतिरिक्त आहे. 

रुग्ण संख्या वाढली 
मागच्या २४ तासांत देशामध्ये ३८६ कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे देशात कोरोनाग्रस्तांची संख्या १६३७ वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतीच दिली आहे. हे भयानक वास्तव पाहता सामाजिक, धार्मिक कार्यक्रम टाळा असे आवाहन देखील आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. भारत नक्की ही लढाई जिंकेल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला आहे.