मुंबई : तिबेटचे अध्यामिक गुरू दलाइ लामा यांनी भारत-चीन वादावर वक्तव्य केले आहे. भारत आणि चीन एक दुसऱ्याला पराभूत नाही करू शकत. दोन्ही देशांना शेजाऱ्यासारखे सोबत राहायला हवे. हिंदी-चीनी भाई भाई ही भावना पुढे नेणे हा एकमेव रस्ता असल्याचेही त्यांनी प्रकर्षाने सांगितले.
दोन्ही देश सैन्य शक्तीने संपन्न आहेत. त्यामुळे दोघांनी चांगल्या शेजाऱ्या सारखे राहिले पाहिजे. सीमेवर गोळीबाराच्या काही घटना होऊ शकतात, त्याला अधिक महत्त्व देऊ नये. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते.
१९५१ मध्ये तिबेट सरकार आणि पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनमध्ये तिबेटच्या स्वातंत्र्याविषयी १७ सूत्री सामंजस्य करार झाला. आता चीन बदलत आहे. तो सर्वाधिक बौध्द लोकसंख्येचा देश बनला आहे. त्यामुळे हिंदी-चीनी भाई भाई या पूर्वीच्या भावनेकडे दोघांनी पुन्हा विचार करायला हवा.