आयकर विभागाची मोठी कारवाई, ३५०० कोटींहून अधिकची बेनामी मालमत्ता जप्त

आयकर विभागाने बेनामी मालमत्तांवर कारवाई करत ३५०० कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. ही कारवाई ९०० पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये करण्यात आली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 11, 2018, 08:07 PM IST
आयकर विभागाची मोठी कारवाई, ३५०० कोटींहून अधिकची बेनामी मालमत्ता जप्त title=

नवी दिल्ली : आयकर विभागाने बेनामी मालमत्तांवर कारवाई करत ३५०० कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. ही कारवाई ९०० पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये करण्यात आली आहे.

आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये प्लॉट, फ्लॅट, दुकानं, ज्वेलरी, वाहन, बँक डिपॉझिट आणि एफडींचा समावेश आहे.

गुरुवारी आयकर विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीत म्हटलं आहे की, काळ्या पैशांविरोधात आपली कारवाई सुरुच राहणार असून बेनामी मालमत्तेविरोधातही कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

बेनामी संपत्ती नेमकी कुठली?

बेनामी संपत्ती म्हणजे अशी संपत्ती ज्यावर कुणाचाही कायदेशीर मालकी हक्क नाही. तसेच एखादा व्यक्ती पैसे भरतो आणि जी संपत्ती विकत घेतो ती दुसऱ्याच्या नावावर घेतो. याच संपत्तीला बेनामी म्हणजे नाव नसलेली संपत्ती असं म्हणतात.

पाच केसेसमध्ये संपत्ती १५०हून अधिक

आयकर विभागाच्या मते, जप्त करण्यात आलेल्या बेनामी संपत्तीपैकी पाच असे प्रकरण आहेत ज्यामध्ये संपत्ती १५० कोटींहून अधिक आहे. तर, एका प्रकरणात रिअल इस्टेट रिअल इस्टेट कंपनीची जवळपास ५० एकर जमीन आहे ज्याची किंमत तब्बल ११० कोटींहून अधिक आहे. ही संपत्ती अशा नागरिकांच्या नावावर होती ज्यांचा जमिनीशी काहीही संबंध नव्हता.