नवी दिल्ली : सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण, ऐन लग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
सोन्याच्या दरात १४५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर ३०६२० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.
सोन्याच्या किंमतीत झालेल्या वाढीसोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. शिक्का निर्मात्यांकडून होणारी मागणी वाढल्याने चांदीच्या दरात १८० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ३९६८० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या दरात ०.०६ टक्क्यांची वाढ होत ते १,३१७ डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तर, चांदीच्या दरात ०.१८ टक्क्यांनी वाढ होत १६९७ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.
देशाची राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोन्याच्या दरात १४५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात क्रमश: ३०,६२० रुपये आणि ३०,४७० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.