नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभाग देशभरात विविध ठिकाणी छापे टाकेले. मध्य प्रदेशातल्या छापेमारीत २८१ कोटींची अवैध रोकड आयकर विभागाच्या हाती लागली. यातल्या २३० कोटींच्या रकमेची देवाणघेवाण दिल्लीत झाली आहे. हवालामार्फत हे पैसे दिल्लीत पोहोचवले गेले. २० कोटींची रोकड दिल्लीत एका पक्षाच्या मुख्यालयात पाठवल्याचंही समोर आले आहे.
तुघलक रोडच्या एका पत्त्यावरून २० कोटी रुपये पाठवले गेले. याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचंही नाव आता समोर येत आहे. तर तिकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव प्रवीण कक्कड यांच्या घरातूनही आयकर विभागानं ९ कोटींची रोकड जप्त केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अश्विनी शर्मा यांच्या कार्यालयातून काही महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत.