Rajasthan Crime News : अत्यंत प्रामाणिक प्राणी अशी कुत्र्याशी ओळख. एका पाळीव कुत्र्याच्या मृत्यूंनतर (death of a dog) दोन वर्षापूर्वी झालेल्या त्याच्या मालकिनीच्या हत्येचे रहस्य उलगडले आहे (Crime News). जिग्गी नावाच्या कुत्र्याच्या मृत्यूमुळे राजस्थानमधील भयानक मर्डर मिस्ट्री (mystery of the murder) सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. यामुळे दोन वर्षापूर्वी घडलेलं हे हत्याकांड पुन्हा चर्चेत आले आहे (Rajasthan Crime News).
राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात दोन वर्षापूर्वी मोनालिसा चौधरी नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता. मोनालिसाच्या कुत्र्यामुळे तिच्या हत्येचा दोन वर्षांनतर उलगडा झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मोनालिसाच्या प्रियकरासह पाच जणांना अटक केली आहे. पोलिस सर्व आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
या प्रकरणातील अटक आरोपी भवानी सिंह शेखावत यानेच मोनालिसाची हत्या केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. शेखावत हा मोनालिसाचा प्रियकर होता. मोनालिसाच्या कुंटुंबियांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. शेखावत याने मोनालिसाला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले होते. असे तिच्या कुटुंबियांनी तक्रारीत म्हटले आहे.
मोनालिसा, शेखावत आणि त्याची आई हे तिघे जण एकत्र राहत होते. मोनालिसाने तीन कुत्रे पाळले होते. शेखावत याच्या आईला देखील या कुत्र्यांचा लळा लागला होता. या दरम्यान 5 फ्रेब्रुवारी 2021 रोजी शेखावत याने मोनालिसाची हत्या करुन तिच्या मृतदेहाची व्हिलेवाट लावली. शेखावत याची आई वारंवार मोनालिसाची चौकशी करत होती. मात्र, शेखावत उडवाउडवीची उत्तर देत विषय टाळत होता.
यानंतर शेखावत याची आई आजारी पडली. शेखावत त्याच्या आईला घेऊन बिकानेरला गेला. या दरम्यान मोनालिसाच्या तीन कुत्र्यांचा सांभाळ एक नोकर करत होता. हलगर्जीपणामुळे मोनालिसाचा आवडता कुत्रा जिग्गी याचा मृत्यू झाला. शेखावत याची आई परत आल्यावर तिने जिग्गीची चौकशी केली. मात्र, शेखावत याने जिग्गीला एक व्यक्तीला विकल्याचे सांगितले. यानंतर आणखी एका कुत्र्याची प्रकृती बिघडली. यामुळे शेखावत याची आई या कुत्र्याला घेऊन प्राण्यांच्या दवाखन्यात गेली. येथेच तिला जिग्गीचा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तिने शेखावत याला या विषयी विचारले. जसं तू जिग्गीला मारुन टाकले तसचं मोनालिसाचा देखील जीव घेतला का असा प्रश्न विचारला.
शेखावतच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली जिग्गीच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी मोनालिसाच्या हत्येच गुढ उकलले. झोपच्या गोळ्या देऊन मोनालिसाची हत्या केल्याची कबुली शेखावत याने पोलिसांना दिली. संपत्तीसाठी मोनालिसाची हत्या केल्याचे शेखावत याने पोलिसांना सांगितले.