नवी दिल्ली : LIC Fraud Alert : देशातील कोट्यावधी LIC पॉ़लिसीधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमिवर पॉलिसीधारकांडून फ्रॉडच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही चोर LIC पॉलिसीधारकांना फोन करीत आहेत, आणि स्वतःला IRDAIचे अधिकारी किंवा LIC चे कर्मचारी असल्याचे सांगून लूट करतात.
काही सराईत चोर LIC च्या ग्राहकांना विश्वासात घेतात आणि त्यांच्याकडून माहिती मिळवतात. त्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे उडवतात. सलग काही दिवसांपासून होत असलेल्या फ्रॉडच्या घटनांमुळे LIC नेदेखील आपल्या ग्राहकांना अलर्ट केले आहे.
— LIC India Forever (@LICIndiaForever) May 24, 2021
LICने आपल्या ग्राहकांना अलर्ट करण्यासाठी एक ट्विट देखील केले आहे. ज्यामध्ये त्यांनी ग्राहकांना अशा प्रकारच्या फ्रॉड कॉलच्या घटनांपासून सावध केले आहे. ग्राहकांना पॉलिसीबाबत खोटी माहिती देऊन लूटतात. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक पॉलिसधारकांची लूट झाल्याचे दिसून आले आहे.
जर तुम्हाला पॉलिसीशी संबधीत कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत संकेतस्थळ www.licindia.in वर जाऊन माहिती मिळवू शकता. तुम्हाला कोणाचाही कॉल आल्यास आणि वयक्तिक माहिती मागितल्यास तत्काळ पोलिसांना त्या कॉलची माहिती द्या.