मुंबई : अमेरिकन औषधनिर्माण संस्था फायझरने (Pfizer Inc) म्हटले आहे की, त्यांनी दोन नवीन लसींच्या सहाय्याने संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रौढांवर चाचणी सुरू केली आहे. कंपनीच्या या चाचणीत कोविड बूस्टर आणि न्यूमोकोकल डोस एकाच वेळी देण्यावर भर दिला जाईल. या चाचणीत सहभागी झालेल्या लोकांना कंपनी 20-व्हॅलेंट न्यूमोकोकल कंज्युगेट लस (20 व्हीपीएनसी) दिली जाईल. ही लस न्यूमोकोकल बॅक्टेरियामुळे होणाऱ्या आजाराशी लढायला मदत करते. या व्यतिरिक्त, फायझर-बायोटेक लसीचा तिसरा डोस देखील सहभागींना देण्यात येईल.
कंपनीने म्हटले आहे की, या अभ्यासामागील उद्देश हे आहे की, एकत्रितपणे लस देणे सुरक्षित आहे की नाही हे समजणे. तसेच, अस्तित्त्वात असलेल्या कोरोना लसींमध्ये निमोनिया लस जोडल्यानंतर प्रतिकारशक्ती कसा प्रतिसाद देते हे पाहाणे आहे. काही तज्ञांचे असेही मत आहे की, न्यूमोकोकल लस कोविड -19 शी लढायला मदत करू शकते.
या अभ्यासामध्ये 65 वर्षे वयोगटातील 600 प्रौढांचा समावेश आहे. फायझरच्या कोविड 19 लसीच्या लेट-स्टेड मधून या लोकांची निवड केली जाईल. याव्यतिरिक्त, या लोकांना अभ्यासात सामील होण्यापूर्वी सहा महिन्यांच्या आत फाइजर लसीचा दुसरा डोस घेणे बंधनकारक असेल.
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने सुचना दिल्या होत्या की, कोविड लस ही एक सिंगल लस म्हणून द्यावी. परंतु नॉन कोरोना लसीच्या आधारे आता अधिकाऱ्यांना असे वाटते की, कोरोना लस आणि इतर लस एकाच दिवशी दिली जाऊ शकते.
अमेरिकेतील फायझर-बायोएनटेकच्या तिसऱ्या डोसविषयी चर्चा जोर धरत आहे, अशा वेळी ही घोषणा करण्यात आली आहे. यावर असे देखील मानले जात आहे की, लोकांना कोरोना बूस्टरची आवश्यकता आहे, कारण लसीच्या दोन डोसनंतर रोग प्रतिकारशक्ती किती काळ टिकेल हे शास्त्रज्ञांना माहिती नाही.
त्याचबरोबर काही घटकांमध्ये अशी चर्चा आहे की, ही लस दुसऱ्या प्रकारच्या विषाणूंवर परिणामकारक ठरू शकत नाही. अशा परिस्थितीत अमेरिकन लोकांना सुरक्षित करण्यासाठी भविष्यात लसींच्या इतर डोसची गरज भासू शकेल. गेल्या आठवड्यात डॉ एंथनी फॉसी आणि फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला यांनी सांगितले की, येत्या काही महिन्यांत लसीचा तिसरा डोस देणे आवश्यक आहे.
बोर्ला म्हणाले की, कंपनी अद्याप बूस्टर डोसबाबत प्राथमिक टप्प्यात आहे. परंतु त्यावरील डेटा सांगत आहे की, बूस्टर लवकरच उपलब्ध होईल. कोरोना टाळण्यासाठी दोन डोस घेतल्यानंतर आठ महिन्यांनंतर या बूस्टरची आवश्यकता असेल.