अहमदाबाद : २८ लाख रूपये दाखवून उमेदवारांना आपचे तिकीट मिळणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला आव्हान निर्माण सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात आपही मागे नाहीए. भाजपा विरोधात उभा असलेला 'आप' ल्या पक्षाचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गुजरात निवडणुकीची तयारी एक करताना ज्यांच्या बँक खात्यात कमीत कमी २८ लाख रूपये कॅश असेल अशा उमेदवारांनाच तिकीट देण्याचे प्रयोजन सुरुआहे. एका सदस्यानेच हा उपाय सुचवला. ज्या उमेदवाराकडे २८ लाख रूपये असतील त्यालाच तिकीट देण्यात यावे. त्यामुळे प्रचारादरम्यान कोणत्या अडचणी येणार नाही असे मत त्याने मांडले.
आपचे प्रवक्ते हर्षिल नायक यांनी उमेदवार कसा असावा याविषयी आपले मत मांडले. त्यानुसार उमेदवाराची प्रतिमा स्वच्छ असावी, मतदारसंघात त्याचं नेटवर्क चांगलं असावं आणि बूथ मॅनेज करण्यासाठी कमीत कमी दोन कार्यकर्ते प्रत्येक मतदार संघात असावेत, अशी सुचना त्यांनी यावेळी केली.
गुजरात निवडणुकीत भाजपाला मात देण्यासाठी आप सज्ज झाली आहे. आपतर्फे १७ सप्टेंबरपासून गुजरातमध्ये प्रचाराला सुरूवात होणार आहे. अनेक ठिकाणी कार आणि बाईक रॅलीची तयारीही आपच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. सर्व जागांवर लढता आलं नाही, तरी काही जागा आम्ही निश्चित लढवू असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.