VIDEO : हे ATM कार्ड नाही तर...इंटरनेटवर व्हायरल झालेले Card पाहून तुम्ही व्हाल कंफ्यूज

PVC Invitation Card : हे ATM कार्ड तुमच्याकडे आलं असेल तर चुकूनही ATM सेंटरला पैसे काढण्यासाठी जावं नका, नाही तर...सोशल मीडियावर असंच एक ATM Card चा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जे पाहून तुम्हीही कंफ्यूज व्हाल. 

नेहा चौधरी | Updated: Dec 1, 2023, 01:09 PM IST
VIDEO : हे ATM कार्ड नाही तर...इंटरनेटवर व्हायरल झालेले Card पाहून तुम्ही व्हाल कंफ्यूज title=
If this is not an ATM card you will be confused by seeing the Wedding invitation card that has gone viral on the internet

PVC Invitation Card Video : सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडीओ किंवा कुठली गोष्ट ट्रेंडमध्ये येईल, याची कोणीही कल्पनाही करु शकत नाही. सध्या लग्नाच सिझन सुरु आहे. अशातच मार्केटपासून सोशल मीडियावर लग्नासंबंधात अनेक ट्रेंड पाहिला मिळत आहेत. लग्नाचा हा सोहळा नवरदेव नवरीसोबतच प्रत्येकासाठी अविस्मरणीय असावा यासाठी हटके आयडिया शोधल्या जातात. यासाठी पोती भरुन पैसाही खर्च केला जातो. ही गोष्ट लक्षात घेत. लग्न सोहळ्यासंबंधातील स्थळ, मेन्यू असो किंवा नवरदेव नवरीचे पोषाख यासाठी हटके आणि भन्नाट कल्पना शोधल्या जातात. त्यातील अजून एक गोष्ट असते ती म्हणजे लग्न पत्रिका...(If this is not an ATM card you will be confused by seeing the Wedding invitation card that has gone viral on the internet)

हे ATM कार्ड नाही तर...

जर तुमच्याकडेही हे ATM कार्ड घरी आलं असेल तर, चुकूनही बँकेत पैसे काढण्यासाठी जाऊ नका. कारण हे ATM कार्ड नाही तर ही लग्नाची पत्रिका आहे. सोशल मीडियावर या कार्डचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. इन्स्टाग्रामवर रीलच्या दुनियत या ATM कार्डचा व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे. होय, हे वेडिंग कार्ड आहे, जे कोणत्याही डेबिट किंवा क्रेडिट कार्डपेक्षा भारी वाटतं. या कार्डच्या एका भागावर 'वेडिंग इन्व्हिटेशन' सोबत वधू-वरांचं नाव आणि लग्नाची तारीख लिहिलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला लग्नाची इतर महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Itsallaboutcards (@itsallaboutcards)

नेटकरी कार्ड पाहून आश्चर्यचकित!

@itsallaboutcards नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर ही अनोखी पत्रिका पोस्ट करण्यात आली आहे.  या पेजवर तुम्हाला लग्नपत्रिकांचे अनोखे आणि हटके कलेक्शन पाहिला मिळतील. यातील सर्वात लोकप्रिय कार्ड म्हणजे एटीएम कार्ड थीम असलेली ही लग्नपत्रिका, पाहून तुम्ही प्रेमात पडाल. 

या कार्डचा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिण्यात आलं आहे की, सुंदर पीव्हीसी निमंत्रण कार्ड. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 1 कोटींहून अधिक व्ह्यूज आणि 1 लाख 21 हजार लाईक्स मिळालेय. तर तुफान कंमेट्सचा पाऊस पडतोय. तुमच्या घरात लग्नघाई असेल तर ही लग्नपत्रिका तुम्हालाही मोहात पाडेल.