मुंबई : HDFC बँकेनंतर आता आणखी एका खाजगी बँकेने कोट्यवधी ग्राहकांना खुशखबर दिली आहे. पूर्वी ही बँक सरकारी होती. पण आता ती खाजगी बँक झाली आहे.
IDBI बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. त्यानंतर आता एफडी करणाऱ्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. व्याजदरातील बदल 20 एप्रिलपासून लागू होणार आहे
बदलानंतर, IDBI बँक 6 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 2.70 टक्के ते 5.60 टक्के व्याज देत आहे. यापूर्वी आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनेही एफडी ठेवींवरील व्याजात वाढ केली आहे.
IDBI बँकेने 7 दिवसांपासून 30 दिवसांपर्यंतच्या 2 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 2.7 टक्के पहिला व्याजदर कायम ठेवला आहे. 31 दिवस ते 45 दिवस या कालावधीत आता 2.80. टक्क्यांऐवजी 3 टक्के व्याज मिळेल.
IDBI बँक FD व्याजदर नवीन व्याजदर
- 7-14 दिवस: 2.7 टक्के
- 15-30 दिवस: 2.7 टक्के
- 31-45 दिवस: 3 टक्के
- 46-60 दिवस: 3.25 टक्के
- 61-90 दिवस: 3.4 टक्के 3.9
- 91 दिवस ते 6 महिने: 3.75 टक्के
- 6 महिने ते 270 दिवस: 4.4%
- 271 दिवस ते 1 पेक्षा कमी: 4.5 टक्के
- 1 वर्षासाठी : 5.15 टक्के
- 1 वर्ष ते 2 वर्षे: 5.25 टक्के
- 2 वर्षे ते 3 वर्षे: 5.35 टक्के
- 3 वर्षे ते 5 वर्षे: 5.5 टक्के
- 5 वर्षांसाठी : 5.6%
- 5 वर्षे ते 7 वर्षे: 5.6%
- 7 वर्षे ते 10 वर्षे: 5.5 टक्के