मुंबई : Rakesh Jhunjhunwala Portfolio: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर सर्वांचे लक्ष लागले आहे. ते वेळोवेळी आपल्या पोर्टफोलिओमध्ये बदल करीत असतात. दरम्यान, झुनझुनवाला यांनी त्यांच्या आवडत्या टाटा समूहाच्या कंपनीचे शेअर्स विकून गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. झुनझुनवाला यांनी FY 2022 च्या चौथ्या तिमाहीत Tata Motors DVR मध्ये प्रॉफिट बुकिंग केली आहे.
राकेश झुनझुनवाला यांनी मार्च 2022 च्या तिमाहीत त्यांच्या पसंतीच्या टाटा समूहाच्या एका कंपनीतील भागीदारी 2.95 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. मार्च तिमाहीसाठी टाटा मोटर्स DVR (Tata Motors Limited Differential Voting Rights) च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश यांच्याकडे आता या कंपनीत 1,50,00,000 शेअर्स म्हणजेच 2.95 टक्के हिस्सा शिल्लक होता. जो पूर्वी 3.93 टक्के होता.
सध्या या शेअरची किंमत 222 रुपये आहे. गेल्या दोन वर्षात हा शेअर 44 रुपयांवरून 222 रुपयांवर आला आहे. म्हणजेच कंपनीने गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा दिला आहे.