Interesting Fact: दोन अक्षरात संपत 'या' रेल्वे स्टेशनचं नावं... वाचून तुम्ही म्हणाल, 'अरेच्चा!!!'

Smallest Name Railway Station: रेल्वेनं आपण हमखास प्रवास करतो. त्यामुळे आपल्याला रोजच्या वेळापत्रकाप्रमाणे ट्रेननं जाताना आपल्यालाही रेल्वे स्थानकांची नावं तोंडपाठ होतात. रेल्वे स्थानकांची नावंही आपल्यालासाठी फारचं इंटरेस्टिंग असतात. 

Updated: Jan 27, 2023, 10:04 PM IST
Interesting Fact: दोन अक्षरात संपत 'या' रेल्वे स्टेशनचं नावं... वाचून तुम्ही म्हणाल, 'अरेच्चा!!!'  title=

Smallest Name Railway Station: रेल्वेनं आपण हमखास प्रवास करतो. त्यामुळे आपल्याला रोजच्या वेळापत्रकाप्रमाणे ट्रेननं जाताना आपल्यालाही रेल्वे स्थानकांची नावं तोंडपाठ होतात. रेल्वे स्थानकांची नावंही आपल्यालासाठी फारचं इंटरेस्टिंग असतात. आपल्याला अनेकदा त्या नावांमागची गंमतही कळत नाही. भारतात असेच एक रेल्वे स्थानक (Railway Station) आहे ज्याचे नाव हे सगळ्यात छोटे आहे. या नावाचीही एक वेगळी गंमत आहे आणि हे नावं लागण्यामागेही एक इंटरेस्टिंग कहाणी आहे. तुमच्या कदाचित लक्षात आलेही असेल किंवा कदाचित तुम्हाला ही गोष्ट माहितीही नसेल. तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो की नक्की या रेल्वे स्थानकाची गंमत आहे तरी काय? (Ib is the smallest railway station name see the full story behind that name)

अनेकदा आपणही कुठल्याही स्टेशनचं नावं बघतो जर ते मोठे असेल तर म्हणतो की, ''अरे हे नावं किती मोठ्ठे आहे''. हो, या शहरातील रेल्वे स्थानकाचे नाव वाचूनही तुम्ही म्हणाल की, ''या रेल्वे स्थानकाचे नाव किती छोटे आहे नाही?'' तुम्हाला माहितीये का की हे रेल्वे स्टेशन हे भारतातच आहे आणि या रेल्वे स्टेशनचं नावं हे काही अक्षरातच संपते. तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का की हे रेल्वे स्थानक नक्की आहे तरी कुठे, चला तर मग जाणून घेऊया या इंटरेस्टिंग स्थानकाविषयी. 

आपल्या देशात साधारणपणे 8000 तरी रेल्वे स्थानकं आहेत. त्यामध्ये मध्य रेल्वे, पुर्व, उत्तर आणि दक्षिण अशी रेल्वे स्थानकं आहेत. त्यामध्ये उडिसा येथे असणाऱ्या या स्थानकाचे नावं तर चक्क दोन अक्षरात संपते. या रेल्वे स्थानकाचे नावं आहे इब (IB). या दोनच अक्षरात हे नावं संपते. या रेल्वे स्थानकाला सर्वात छोटं रेल्वे स्थानक म्हणून गौरविण्यातही आलं आहे. इब नदीच्या जवळ हे रेल्वे स्थानक आहे. 1891 साली बंगाल-नागपूर रेल्वेची 
नागपुर-आसनसोल मुख्य लाईनचे उद्धाटन केले होते त्यादरम्यान जन्मला आलेले नावं आहे. हावडा-मुंबई-नागपूर लाईनवर हे स्टेशन 1900 साली स्थापन करण्यात आले. 

हे स्टेशन जेव्हा बनवायला सुरूवात केली तेव्हा येथे काही कोळश्याच्या खाणीही सापडल्या होत्या. तेव्हा या स्टेशनला कोलफिल्डही म्हटले जाते. इब हे देशातील आणि जागतिक सर्वात लहान स्थानक आहे तर वेंकटनरसिम्हाराजुवारिपेटा स्टेशन (Venkatanarasimharajuvaripeta Railway station) हे सर्वात मोठ्या नावाचे स्टेशन आहे. अशाच अनेक इंटरस्टिंग गोष्ट आपल्या जगात आहेत काही नैसर्गिक आहे तर काही मानवनिर्मित आहे परंतु त्या जाणून घ्यायला आपल्याला कायमच आवडते.