"...माझा आनंद वाढतो", आयएएस अधिकारी टीना डाबी यांचा जुना व्हिडीओ व्हायरल

आयएएस अधिकारी टीना डाबी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. टीना डाबी या त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफशी संबंधित माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

Updated: Aug 1, 2022, 01:11 PM IST
"...माझा आनंद वाढतो", आयएएस अधिकारी टीना डाबी यांचा जुना व्हिडीओ व्हायरल title=

IAS Officer Tina Dabi: आयएएस अधिकारी टीना डाबी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. टीना डाबी या त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफशी संबंधित माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक या सोशल मीडिया साइट्सवर टीना यांचे खूप सारे फॅन फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. टीना डाबी यांनी तीन महिन्यांपूर्वी राजस्थान कॅडरचे आयएएस प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्न केले. प्रदीप गावंडे हे सध्या उच्च शिक्षण विभागात सहसचिव आहेत. टीना डाबी सध्या राजस्थानच्या जैसलमेरमध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर व मॅजिस्ट्रेट पदावर कार्यरत आहेत. टीना डाबी यांची कार्यक्षमता पाहून सरकारने पदोन्नती दिली आहे. टीना डाबी अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करत असतात. त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडीओ त्यांनी दीड वर्षांपूर्वी पोस्ट केला होता. या व्हिडीओत त्या आपल्या आवडीबाबत सांगत आहेत. कारण त्यांना पुस्तक वाचनाची आवड आहे. पुस्तकं पाहिल्यानंतर त्यांना आनंद होतो. एवढेच नाही तर त्या फावला वेळ पुस्तक वाचनात घालवतात. 

19 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांनी केलेल्या व्हिडीओ पोस्टनुसार, त्या एका पुस्तकाच्या दुकानात गेल्या आणि नंतर काही पुस्तके खरेदी केली. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, 'पुस्तकांच्या किमती निम्म्या झाल्यामुळे माझा आनंद वाढतो.' त्याचा हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इतकंच नाही तर टीना डाबी त्यांच्याकडे कोणती पुस्तकं आहेत आणि अजून वाचलेली नाहीत याची यादी बनवतात. दुसर्‍या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे अजूनही 7 पुस्तके आहेत जी अजून वाचायची आहेत. आजही टीना डाबीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टीना डाबी या यूपीएससी-2015 मध्ये टॉपर होत्या. त्याचबरोबर तिची धाकटी बहीण रिया डाबी या देखील यूपीएससी-2021 उत्तीर्ण झाल्या आहेत. रियाने आयएएस परीक्षेत 15 वा क्रमांक मिळविला आहे. मोठ्या बहिणीप्रमाणे रिया या सुद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.