मुंबई : आयएएस अधिकारी व्हाव असं अनेक तरूण-तरूणींच स्वप्न असतं. मात्र आयएएस अधिकारी होण्याआधी त्यांना पगार किती असतो. त्यांना कोण कोणती काम करायची यांची माहीती अनेकांना नसते. हीच माहिती या बातमीत तूम्हाला मिळणार आहे.
आयएएस अधिकाऱ्यांची काम कोणती असतात
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या उमेदवारांना IAS होण्याची संधी मिळते. भारतीय प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून त्यांना देशाच्या नोकरशाही संरचनेत काम करण्याची संधी मिळते आणि विविध मंत्रालये आणि प्रशासन विभागांमध्ये आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. आयएएस अधिकाऱ्यासाठी कॅबिनेट सचिव हे सर्वात वरिष्ठ पद आहे.
7 व्या वेतन आयोगानुसार पगार किती?
7 व्या वेतन आयोगानुसार IAS अधिकाऱ्याला 56100 रुपये मूळ वेतन मिळते. याशिवाय, TA, DA आणि HRA (TA, DA, आणि HRA) व्यतिरिक्त इतर अनेक भत्ते देखील IAS अधिकाऱ्याला दिले जातात. रिपोर्ट्सनुसार, एका IAS अधिकाऱ्याला सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रत्येक भत्त्यांसह एकूण 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मिळतो.
IAS अधिकाऱ्याचा कमाल पगार किती?
आयएएस अधिकारी पदोन्नतीनंतर कॅबिनेट सचिव पदावर पोहोचू शकतो.कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला सर्वाधिक पगार मिळतो. कॅबिनेट सेक्रेटरी झाल्यानंतर एका आयएएस अधिकाऱ्याला महिन्याला सुमारे अडीच लाख रुपये पगार मिळतो. याशिवाय इतर सुविधा व इतर भत्तेही दिले जातात.
पगाराव्यतिरिक्त 'या' लक्झरी सुविधा मिळतात
पगाराव्यतिरिक्त, आयएएस अधिकाऱ्याला वेगवेगळ्या पे-बँडनुसार इतर लक्झरी सुविधा देखील दिल्या जातात. मूळ वेतनाव्यतिरिक्त, आयएएस अधिकाऱ्याला महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), अनुदानित बिल, वैद्यकीय भत्ता आणि वाहतूक भत्ता दिला जातो.याशिवाय पे-बँडच्या आधारे आयएएस अधिकाऱ्याला घर, सुरक्षा, स्वयंपाकी आणि इतर कर्मचाऱ्यांसह अनेक सुविधा दिल्या जातात. आयएएस अधिकाऱ्याला कुठेही ये-जा करण्यासाठी वाहन आणि चालकाची सुविधाही मिळते. याशिवाय पोस्टिंगच्या काळात कुठे जावे लागले तर प्रवास भत्त्याव्यतिरिक्त सरकारी घरही दिले जाते.