सरकारी रूग्णालयात बाळाला जन्म देऊन IAS महिला ऑफिसरचा नवा आदर्श

किरण कुमार पासींचं सर्वस्तरावरून कौतुक 

Updated: Mar 2, 2020, 11:33 AM IST
सरकारी रूग्णालयात बाळाला जन्म देऊन IAS महिला ऑफिसरचा नवा आदर्श  title=

रांची : सरकारी रूग्णालय आता रिकामीच दिसतात. तेथे उपचार घेताना सुरूवातीला सगळेच टाळाटाळ करतात. याला कारणही तसंच आहे. तिथे असलेला सुविधांचा अभाव आणि तेथील कर्मचाऱ्यांचा सर्वसामान्यांशी असलेला संबंध. अगदीच कुणाकडे पर्याय नसेल तर सामान्य माणूस सरकारी रूग्णालयात उपचार घेताना दिसतो. पण या सगळ्याला फाटा देत एका आयएएस अधिकारी महिलेने सगळ्यांसमोर अनोखा आदर्श ठेवला आहे. 

झारखंडच्या गोड्डामध्ये आयएएस अधिकारी महिलाने चक्क सरकारी रूग्णालयात प्रसूती करून महिलांसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे.  सामान्य माणूसही या रूग्णालयात पाय ठेवायला कारणं शोधतो तिथे चक्क महापालिकेच्या उपायुक्तांनीच सरकारी रूग्णालयात जाणे पसंत केलं. एवढंच नव्हे तर तिथे आपली प्रस्तुती करून घेतली.

आयएएस अधिकारी किरण कुमारी पासीने सिझेरिएनच्या मार्फत बाळाला जन्म दिला आहे. बाळ आणि आई दोघंही सुखरूप असल्याचं सांगितलं जातंय. अधिकारी महिलेने सरकारी रूग्णालयात प्रसूती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सगळ्याच स्तरावरून कौतुक होत आहे. 

दोन दिवस रूग्णालयात ठेवल्यानंतर किरण कुमारी यांना घरी सोडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सरकारी रूग्णालयातील डॉक्टरांनी देखील किरण कुमार यांच मनापासून कौतुक केलं आहे. किरण कुमार यांनी समाजासमोर एक अनोखा आदर्श उभा केला. या प्रसूतीनंतर झारखंडमधील अनेक महिला सरकारी रूग्णालयात आपली प्रसूती करून घेतली असा विश्वास डॉक्टरांकडून व्यक्त केला जात आहे.