IAS Story : दर दुसऱ्या IAS अधिकाऱ्याच्या यशामागे इतका संघर्ष का असतो, ही कहाणी पाहून लक्षात येईल

IAS Success Story : आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग हा सापडतोच. आज आम्ही तुम्हाला आयएएस डॉ. राजेंद्र भारुड (Dr. Rajendra Bharud) यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगणार आहेत.

Updated: Aug 11, 2022, 11:52 AM IST
IAS Story : दर दुसऱ्या IAS अधिकाऱ्याच्या यशामागे इतका संघर्ष का असतो, ही कहाणी पाहून लक्षात येईल title=

IAS Success Story :   "अगर किसी भी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है। ".  शाहरुख खानचा हा डायलॉग तुम्ही अनेकदा ऐकलाचं असेल. आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग हा सापडतोच. अपयशाने खचलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयएएस डॉ. राजेंद्र भारुड यांचा जीवन प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी असेल.

आज आम्ही तुम्हाला आयएएस डॉ. राजेंद्र भारुड (Dr. Rajendra Bharud) यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगणार आहेत.

महाराष्ट्रातल्या साकरी तालुक्यातल्या सामोदे गावात 7 जानेवारी 1988ला डॉ. राजेंद्न भारुड यांचा जन्म झाला. डॉ.भारुड यांचा जन्म होण्याआधीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होतो. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांच्या वडिलांचा फोटो घरात लावण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. घर चालण्यासाठी डॉ.भारुड यांच्या आईने दारु विकली आहे. 

डॉ. राजेंद्र भारुड यांनी त्यांच्या लहानपणीचा अनुभव सांगताना असं म्हणाले की, ते तीन वर्षांचे असताना भूक लागली म्हणून एकदा रडत होते. दारु पिणारे लोक त्यांच्या रडण्याने नाराज झाले होते. त्यापैकी काही लोकांनी तर यांना शांत करण्यासाठी त्यांच्या तोडात दारुचे काही थेंब टाकत होते. ते लहान असताना त्यांची आजी दुध पाजण्याऐवजी दारु पाजत होती. यामुळे त्यांची भूक मारली जायची आणि ते रडायचं बंद करत होते. याचा परिणाम असा झाला की, दारु पिण्याची सवयच लागली. अगदी सर्दी-खोकला जरी झाला तरी ते औषध पिण्याऐवजी दारु पित असे. 

डॉ. भारुड यांनी घराबाहेरच्या ओट्यावर बसून त्यांनी आभ्यास केला आहे. कधी-कधी तर दारु पिण्यासाठी आलेले लोक त्यांना त्यांना स्कॅक्स आणायला अतिरिक्त पैसे देत असायचे. त्यांना मिळालेल्या या पैशांनी पुस्तके विकत घेतली होती. प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी 10 वी ला 95 टक्के तर 12 वी ला 90 टक्के मिळवून यश मिळवलं.

एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देण्याचा डॉ. भारुड यांनी निर्णय घेतला. तो काळ त्यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि आव्हानात्मक होता. याचं कारण, म्हणजे ते इंटर्न असताना एकाच वेळी दोन परीक्षांची तयारी करत होते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे युपीएससीची परीक्षा जिची ओळख ही देशातली सर्वात अवघड परीक्षा मानली जाते ती त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी केली. सहाजिकच, त्यांच्या आईला युपीएससीच्या परीक्षेबद्दल कसलीही माहिती नव्हती. शिक्षण पुर्ण केल्यानंतर जेव्हा डॉ. राजेंद्र भारुड घरी आले तेव्हा त्यांच्या आईला खुप आनंद झाला होता.

डॉ. राजेंद्र भारुड (Dr. Rajendra Bharud) यांनी 2014 ला 'मी एक स्वप्न पाहिल' या नावाने पुस्तक लिहिलं. या पुस्तकात त्यांच्या आईने घर चालवण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवासाबद्दल लिहिलं आहे. हे पुस्तक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना, आयुष्यात अडचणी आल्या म्हणून खचणाऱ्या व्यक्तींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरु शकेल.